Sanatan Rashtra Mahotsav Dainik Gomantak
गोवा

हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी; शनिवारपासून गोव्यात 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन आणि दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन ६ हजार चौरसफूट क्षेत्रामध्ये मांडण्यात येणार आहे.

Pramod Yadav

फोंडा: सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव गोव्यात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने १७ मेपासून फर्मागुडी, फोंडा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव पार पडेल.

भारतासह २३ देशांतील नागरीक, संत, महंत, काही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच २५ हजारांहून साधक या महोत्सवाला उपस्थिती लावणार आहेत. महोत्सवासाठी गोवा राज्यातून ५ हजारांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदु आणि प्रतिष्ठित लोक उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फोंडा येथील ‘पॅन अरोमा’ या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (IAS) अरुण देसाई, गोव्याचे माजी निवडणूक आयुक्त नारायण नावती, कवळे येथील शांतादुर्गा मंदिराचे पुरोहित प्रणव साधले, उद्योजक जयंत मिरिंगकर, जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी अनिल नाईक आणि हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सत्यविजय नाईक हे उपस्थित होते.

ऐतिहासिक आणि दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन आणि दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन ६ हजार चौरसफूट क्षेत्रामध्ये मांडण्यात येणार आहे.

यात गोव्यातील सौंदेकर घराण्यातील प्राचीन शस्त्रे, कोल्हापूर येथील सव्यासाची गुरुकुलम्चे शस्त्रप्रदर्शन, पुणे येथील शिवाई संस्थानचे शस्त्रप्रदर्शन, तसेच मुख्य आकर्षण म्हणून शिवाजी महाराजांचे सरदार येसाजी कंक यांची तलवार, सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत आणि वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा साखळदंड आदी विशेषत्वाने पाहण्याची संधी सर्वांना लाभणार आहे.

एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन

या महोत्सवात एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी सर्वांना मिळणार आहे. हे शिवलिंग मूर्तीभंजक महंमद गझनी याने तोडले होते आणि नंतर त्याचा पुढे अग्निहोत्र संप्रदायाच्या साधकांनी सांभाळ केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT