शिवोलीत कॉग्रेस कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करतांना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि इतर Dainik Gomantak
गोवा

शिवोलीत राजकीय इतिहास बदलण्याची मतदारांना संधी

ज्या कॉग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची विस्कळीच घडी जाग्यावर आणली तीच कॉग्रेस शिवोली मतदार संघाचा कायापालट घडवून आणणार

दैनिक गोमन्तक

शिवोली: शिवोलीत (Siolim) नवीन राजकीय इतिहास घडविण्याची संधी येथील मतदारांना प्राप्त झालेली आहे. या संधीचे सोने करतांना स्थानिक मतदारांनी कॉग्रेसला (Congress) एकदाच  सत्तेवर आणून पाहावे , ज्या कॉग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची विस्कळीच घडी जाग्यावर आणली तीच कॉग्रेस शिवोली मतदार संघाचा कायापालट घडवून आणणार असल्याचे माजी आमदार तथा समाजकल्याण मंत्री अड. चंद्रकांत चोडणकर यांनी शिवोलीत सांगितले.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवोली मतदार संघासाठीचे संभाव्य उमेदवार दत्ताराम पेडणेकर यांच्या मार्ना शिवोलीतील नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात चोडणकर बोलत होते. यावेळी, त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रभारी बाबी बागकर, शिवोली गटाध्यक्ष पार्वती नागवेंकर, युवा कार्यकर्ते चंदन मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला दहा हजारांहून आधिक मताधिक्य दिल्याचे सांगितले तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत येथील कॉग्रेसचा उमेदवार विजयी आकडां निश्चितच पार पाडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी, दत्ताराम पेडणेकर , बाबी बागकर, तुलियो डिसौझा, चंदन मांद्रेकर पार्वती नागवेंकर यांची समयोचित भाषणे झाली. दरम्यान, शिवोलीसाठी कॉग्रेसचे संभाव्य उमेदवार असलेल्या दत्ताराम पेडणेकर यांनी प्रचाराची धुमधडाक्यात सुरुवात केली असून घरांघरातून आपल्याला मतदारांचा उत्साही प्रतिसाद मिळत असल्याचे दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT