Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्‍नी भाजपचा ‘कल्पक’ गोंधळ; विरोधकांची टीका

मंत्र्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे ‘रीतसर दिशाभूल'

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्‍नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करणारे वक्तव्य गोवा मंत्रिमंडळातील दोघा ज्येष्ठ सदस्यांनी करण्यामागे रीतसर व्यूहरचना असल्याची टीका विरोधक करीत आहेत.

वास्तविक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अजूनतरी शहा यांना दोष दिलेला नाही. परंतु, त्यांची विरोधी सदस्य कोंडी करीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी परस्परविरोधी विधाने करावेत, अशी व्यूहरचना भाजपमध्येच शिजली आहे.

सोमवारी गोवा मंत्रिमंडळातील दोन सदस्य नीलेश काब्राल व सुभाष शिरोडकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करणारे वक्तव्य केले आहे. ‘अमित शहा यांनी म्हादईप्रश्‍नी केलेले निवेदन गोव्याला अंधारात ठेवून केले आहे.

त्यांची गोवा सरकारबरोबर याप्रश्‍नी कोणतीही चर्चा झाली नव्हती. केंद्राने म्हादईप्रश्‍नी जर गोव्याशी काही चर्चा केली असेल, तर ती त्यांनी जरूर सांगावी. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे’, असे काब्राल यांनी म्हटले आहे.

‘अमित शहा यांचे उद्‍गार आम्हाला मान्य नाहीत. त्यांची म्हादईप्रश्‍नी गोवा सरकारबरोबर कोणतीही चर्चा झालेली नाही. गोव्याचे शिष्टमंडळ त्यांना भेटले तेव्हा गोवा व कर्नाटक ही दोन्ही राज्ये आमचीच आहेत आणि दोघांनाही विश्‍वासात घेऊन आम्ही निर्णय घेऊ’, असे आश्‍वासन त्यांनी आम्हाला दिले होते, असा खुलासा शिरोडकर यांनी केलाय.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडणार आहोत आणि राज्य सरकार तेथे आपली बाजू पटवून देण्यात यशस्वी होईल’, असे मत व्यक्त केले आहे. येत्या १३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात म्हादईचा प्रश्‍न सुनावणीसाठी येईल.

‘गोव्याला जर केंद्राचा पाठिंबा मिळाला नाही, तर आम्ही न्यायालयात प्रभावीपणे झुंज देऊ’, असे विधान पर्यावरण मंत्री काब्राल यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचा निषेध करताना काल केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सुद्धा म्हादईप्रश्‍नी कोणतीही तडजोड करणार नाहीत; कारण म्हादई ही त्यांचीही माता आहे’, असे काब्राल म्हणाले आहेत.

विरोधी नेत्यांच्या मते...

1. भाजपच्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या सुरात बोलून गोंधळ निर्माण करावा व विरोधकांची दिशाभूल करावी, असा सुनियोजित कट शिजला आहे.
2. त्याच गोंधळाचा भाग म्हणून मंत्री परस्परविरोधी विधाने करीत सुटले आहेत.
3. मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र बाजूला उभे राहून अमित शहा यांच्या विधानाशी सहमती किंवा विरोध काहीच व्यक्त करीत नाहीत, हे विचित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa News: 'कॅश फॉर जॉब' प्रकरणी दीपश्रीला पुन्हा अटक; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT