Sanguem : 15 वर्षांपासून दामाळ पाजीमळ ग्रामस्थांना भेडसावतेय पाण्याची समस्या

समस्येची चौकशी करुन लवकरच पाण्याचा प्रश्न सोडवू; शिरोडकर यांचे आश्वासन
Sanguem Water Issue
Sanguem Water IssueDainik Gomantak

Sanguem : दामाळ पाजीमळ सांगे येथील लोकांना 15 वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. या गावात 16 आणि त्याहून अधिक घरे आहेत. तसेच हे गाव नुकतेच साळवली धरणाला जोडलेले आहे तरीही त्यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

गेली 2 वर्षे गावातील ग्रामस्थ पीडब्लूडी कार्यालयात तक्रारी करत आहेत. परंतु अजूनही त्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाण्याची समस्या न सुटल्यास सर्व ग्रामस्थ भांडी घेवून कार्यालयावर धडक मोर्चा काढू असा ईशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

Sanguem Water Issue
Cashew Feni: काणकोणात काजू फेणी गाळपाचे 89 विभाग

दरम्यान, या समस्येवर एई पीडब्ल्यूडी सुबोध शिरोडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, या भागाची मी व संबंधीत कर्मचाऱ्यांनी तपासणी केली आहे. ही उंचीवर असल्याने त्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. यावर तांत्रिक दृष्ट्या उपाययोजना करण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. या समस्येची चौकशी करू आणि लवकरच हा प्रश्न सोडवू असे सांगितले.

दामाळ पाजीमळ सांगे येथील हे गाव नुकतेच साळवली धरणाला जोडलेले आहे. पाणी येत असले तर तेही थेंबभर येते त्यामुळे आमचा बहुतांश वेळ पाण्याच्या नळांवरच जातो अशी येथील ग्रामस्थांची तक्रार आहे.

दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी पीडब्ल्यूडी पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला होता, मात्र या समस्येवर तोडगा निघण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.

Sanguem Water Issue
Goa Burning Truck: गोव्यातून बंगळूरकडे जाणाऱ्या ट्रकने अनमोड घाटात घेतला पेट

दरम्यान, बाणावलीतील पेडा वार्का येथील स्थानिक नागरिकांनाही गेल्या कित्येक दिवसांपासून पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. नागरिकांना कधी रात्री 1 ते 2 तास पाणी मिळते तर कधी खूप संथ गतीने पाणीपुरवठा होतो.

हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. यावेळी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सोमवारी याबाबतची लेखी तक्रार बाणावलीचे आमदार वेन्झी व्हीएगस यांच्याकडे केली.

याबाबतची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार व्हीएगस यांनी पेडा वार्का येथे जात त्या भागातील पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची पाहणी केली.

येथील स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडवण्याची जवाबदारी मी घेतो. नागरिकांना लवकरच सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com