Damu Naik Dainik Gomantak
गोवा

Operation Sindoor: ‘सिंदूर’ हा दहशतवादाच्या मुळावर घणाघात! मोदी सरकार, सैन्यदलांवर भाजप नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Damu Naik: एका धाडसी आणि बहुआयामी लष्करी मोहिमेत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ मोठ्या राज्यप्राय दहशतवादी तळांचा यशस्वीपणे खातमा केला.

Sameer Panditrao

पणजी: एका धाडसी आणि बहुआयामी लष्करी मोहिमेत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ मोठ्या राज्यप्राय दहशतवादी तळांचा यशस्वीपणे खातमा केला. या कारवाईचे राज्यभरातून स्वागत होत असून सशस्त्र दलांचे आणि मोदींच्या नेतृत्त्वातील सरकारचे अभिनंदन होत आहे.

‘आॅपरेशन सिंदूर’ हा दहशतवादाच्या मुळावर घणाघात आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केली. बहावलपूरपासून मुजफ्फराबादपर्यंत हे तळ लपवलेले नव्हते, ते पाकिस्तानने स्वतःच्या संरक्षणाखाली, पाठिंब्याने आणि संगोपनाने वाढवले होते,असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ही निर्णायक कारवाई भयावह पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात झाली आहे, जिथे हिंदूंना लक्ष्य करून निर्दयपणे ठार मारण्यात आले. भारताने तेव्हाच मौन बाळगले, वेदना पचवल्या, आणि योग्य वेळ आल्यावर उत्तर दिले. भाजप गोवा प्रदेशातर्फे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठोस नेतृत्व आणि निर्णायक कृतीबद्दल अभिनंदन करतो. दहशतवादी तळांवर नियोजनबद्ध हल्ले करणाऱ्या सशस्त्र दलांचेही अभिनंदन करतो, अशा शब्दांत नाईक यांनी आॅपरेशन सिंदूरच्या यशाचे कौतुक केले आहे.

खासदार सदानंद शेट तानावडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेला कारवाईचे हे निर्णायक पाऊल देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक होते. ही कारवाई भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक असून आतंकवादाविरुद्ध सरकारची शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्ट करते. त्यांनी केंद्र सरकारचे आणि संरक्षण दलांचे अभिनंदन करताना असेही नमूद केले की, देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, ही भूमिका देशवासीयांच्या मनात विश्वास निर्माण करणारी आहे.

अमरनाथ पणजीकर, अध्यक्ष, मीडिया सेल कॉंग्रेस

ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी आपल्या शूर भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन करते. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. या महत्त्वाच्या क्षणी, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकार आणि सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. देशाच्या सुरक्षेबाबत राजकारणाला जागा नसावी या क्षणी फक्त एकजूट आणि देशप्रेम हवं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Down: दिवाळीला गावी जायचं कसं? तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप अचानक डाऊन; प्रवाशांना मनस्ताप

Rama Kankonkar: एकच सवाल, ‘रामावर हल्ला का झाला?’

ज्युनिअरने लास्ट ईअरच्या विद्यार्थीनींवर कॉलेजच्या बाथरुममध्ये केला लैंगिक अत्याचार; अत्याचारानंतर म्हणाला, 'गोळी हवी का'?

Ravi Naik: फोंड्यात 'रवीं'चे अस्तित्व ठायी ठायी जाणवते! आता पुढे?

अग्रलेख: 'जंगल नसेल तर वाघाचा जीव जाईल, जर वाघ नसेल तर जंगल नष्ट होईल', गोव्यातील व्याघ्र प्रकल्पाचा तिढा

SCROLL FOR NEXT