Rajendra Kerkar Dainik Gomantak
गोवा

Kerim-Sattari: चांगले संस्कार देणारे वाचन करा -राजेंद्र केरकर

राजेंद्र केरकर : केरी-सत्तरी येथे मराठी सांस्कृतिक केंद्राचे उत्‍साहात उद्‌घाटन

दैनिक गोमन्तक

Kerim-Sattari: भाषा टिकविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. नवीन पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवायला हवेत. नेहमी चांगले संस्कार देणारे वाचन करा. तसेच आपण इतरांशी चांगल्या प्रकारे कृती करणे, चांगले वागणे ही आमची संस्कृती. ही संस्कृती टिकवून ठेवणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन ज्‍येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केले.

गोवा मराठी अकादमी पुरस्कृत केरी-सत्तरी मराठी सांस्कृतिक केंद्राचा उद्‌घाटन सोहळा नुकताच रावण-सत्तरी येथील श्री सातेरी केळबाय देवस्थानच्‍या सभामंडपात पार पडला. यावेळी केरकर बोलत होते.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोवा मराठी अकादमीचे सदस्य तथा सत्तरी तालुका समन्वयक आनंद मयेकर, प्रमुख वक्ते साहित्यिक चंद्रकांत गावस, सत्तरी तालुका समिती अध्यक्ष नरहरी हळदणकर, तालुका समिती सचिव रामकृष्ण गावस, देवस्थान समितीचे अध्यक्ष आपा गावस, केरी-सत्तरी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आत्माराम गावस, उपाध्यक्ष गौतम गावस आदी मान्यवर उपस्थित होते. त्‍यांनी विचार मांडले. आत्माराम गावस यांनी प्रास्ताविक, आपा गावस यांनी सूत्रसंचालन तर रामकृष्ण गावस यांनी आभार मानले.

लोककलांना मिळाला उदंड प्रतिसाद

शिरोली-केरी येथील सौम्या नीलेश शेटकर हिने सवेश प्रवेश सादर केला. श्री सातेरी केळबाई महिला मंडळ रावण-सत्तरी (कळशी नृत्य), घुमटांच्या तालावर राम भजन, मोरजकर लोकगीत कला केंद्र पेळावदेतर्फे दवली मांड व रावण येथील स्थानिक कलाकारातर्फे दिंडी हे कार्यक्रम सादर करणण्‍यात आले. त्‍यास उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल गावस यांनी केले तर गौतम गावस यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT