Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: नीलेश काब्राल हे जरी माझे विरोधक असले, तरी ते कार्यक्षम मंत्री होते; विजय सरदेसाई

Vijay Sardesai: माझ्‍या फक्‍त तीन उमेदवारांचीच पीडब्‍ल्‍यूडीच्या भरती यादीत नावे आमदार विजय सरदेसाई यांचा खुलासा

दैनिक गोमन्तक

Vijay Sardesai: सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या नवीन नोकरभरती सध्‍या वादग्रस्‍त झालेली असताना कोणत्‍या आमदाराचे किती उमेदवार, या यादीत पात्र ठरले, हा विषय चर्चेत आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी आपण शिफारस केलेल्‍या फक्‍त तिघांचीच नावे या यादीत असून त्‍यांची निवड त्‍यांनी दिलेल्‍या परीक्षेच्‍या गुणांवरुनच झालेली आहे, असा खुलासा केला आहे.

सरदेसाई यांच्‍या 11 उमेदवारांना या यादीत स्‍थान मिळाले आहे, अशा आशयाची बातमी सध्‍या चर्चेत असताना सरदेसाई यांनी हा खुलासा केला आहे. ज्‍या तिघांची निवड झाली आहे, ते तिन्‍ही उमेदवार हुशार असून त्‍यांच्‍याकडून कोणी एकही पैसा घेतलेला नाही आणि ज्‍यांची निवड झालेली आहे, त्‍यांची आर्थिक ऐपत पैसे देण्‍यासारखी नाही, हेही तेवढेच खरे आहे, असे विजय सरदेसाई म्‍हणाले.

सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे माजी मंत्री नीलेश काब्राल हे जरी माझे विरोधक असले, तरी ते कार्यक्षम मंत्री होते. कित्‍येक कामे त्‍यांनी तत्‍परतेने पूर्ण केली होती. यासाठीच मी त्‍यांना पाठिंबा दिला आहे. काब्राल यांना मी जवळून ओळखतो. त्‍यामुळेच नोकऱ्या देण्‍यासाठी त्‍यांनी पैसे घेतले आहेत, यावर माझा विश्‍वास बसत नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT