Women in Goa's Politics: काल गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, 40 मतदारसंघांसाठीची लढत संपली आहे. 301 उमेदवारांपैकी 261 उमेदवार पराभूत होऊन घरी परतले. 15 मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या 26 महिलांपैकी केवळ 3 महिलांनीच विजय मिळवला.
या विजयी महिलांमध्ये दोन नवीन चेहरे आहेत ते म्हणजे दिव्या राणे आणि दिलायला लोबो (Delilah Lobo). जेनिफर मॉन्सेरात (Jennifer Monserrate) या दोघींपैकी अधिक अनुभवी आहेत. त्यांनी याआधी मंत्री म्हणूनही काम केले आहे.
दिव्या राणे (Divya Rane) या त्यांचे सासरे प्रतापसिंह राणे यांच्या मतदारसंघात विजयी झाल्या असून, त्यांना 17,816 मते मिळाली. दिव्या जवळपास 14,000 च्या फरकाने विजयीझाल्या आहेत. खरे तर इतक्या मोठ्या फरकाने विजयी झालेल्या त्या एकमेव उमेदवार आहेत.
डॉ.राणे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली. यावेळी विजय संपादन केल्यानंतर त्या म्हणाल्या, 'हे सर्व पर्येतील लोकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच शक्य झाले. माझे सासरे जे एक अनुभवी राजकारणी आहेत आणि माझे पती जे गोव्याच्या राजकारणात लोकप्रिय आहेत, यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.'
जेनिफर मॉन्सेरात यांनीदेखील आपल्या पतीसोबत विजय संपादन केला असून यात लोबो दाम्पत्यही मागे राहिले नाही. अशाप्रकारे गोव्याच्या यंदाच्या निवडणुकीत 26 महिलांपैकी फक्त 3 महिलाच विजयी झाल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.