Goa Computer Education  X
गोवा

Goa Education: चिंताजनक! गोव्यातील 80% सरकारी शाळांमध्ये संगणक सुविधा नाही; UDISE ची रिपोर्ट

Goa school computer facilities: गोव्यातील ७८९ सरकारी शाळांपैकी केवळ १५८ म्हणजेच केवळ २० टक्के शाळांमध्ये शैक्षणिक हेतूसाठी कार्यरत संगणक सुविधा आहे.

Sameer Panditrao

Only 20% Goa government schools have computers UDISE 2023 report

पणजी: भारत सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जारी केलेल्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस २०२३-२४ अहवालात म्हटले आहे की, गोव्यातील ७८९ सरकारी शाळांपैकी केवळ १५८ म्हणजेच केवळ २० टक्के शाळांमध्ये शैक्षणिक हेतूसाठी कार्यरत संगणक सुविधा आहे.

गोव्यातील एकूण १४८७ शाळांपैकी ८१६ म्हणजे ५४.९ टक्के शाळांमध्ये अशा सुविधा आहेत. त्यात २० टक्के सरकारी शाळा, ९४.६ टक्के सरकारी अनुदानित शाळा आणि ९२.९ टक्के खासगी अनुदानित शाळांमध्ये संगणक सुविधा आहेत. राज्यात ६७१ शाळांमध्ये संगणक संबंधी कोणतीही सुविधा नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चंदीगडमधील १०० टक्के शाळा, दिल्लीतील ९९.९ टक्के शाळा, पुद्दुचेरीमधील ९९.३ टक्के शाळा आणि केरळमधील ९९.१ टक्के शाळांमध्ये अध्यापनाच्या उद्देशाने संगणक सुविधा आहे.

९ टक्के शाळा विशेष मुलांना अनुकूल

गोव्यातील १४८७ शाळांपैकी केवळ ९ टक्के म्हणजेच १३१ शाळांमध्ये विशेष मुलांसाठी अनुकूल शौचालये आहेत. सर्व ६३ टक्के शाळांमध्ये रॅम्प आहेत आणि ५७ % शाळांमध्ये रॅम्प आणि हँड रेल आहेत. राज्यातील शाळांमध्ये ४३४१ विशेष गरजा असलेली मुले नोंदणीकृत आहेत, ज्यात २७९१ मुले आणि१५५० मुली आहेत.

गोव्यात १४८७ शाळा आहेत ज्यापैकी ८६२ पायाभूत सुविधा आहेत . ज्यात ३, ०४, ७३५ विद्यार्थ्यांची नोंदणी आहे ज्यांना १४५९४ शिक्षक शिकवतात.

१३५३ शाळांमध्ये क्रीडांगण,३२ शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी,

१४७७ शाळांमध्ये मुलींची स्वच्छतागृहे आणि १४७६ शाळांमध्ये मुलांची स्वच्छतागृहे आहेत.

माध्यमिक स्तरावरील गळतीचे प्रमाण ७.८ टक्के असून या स्तरावर १० टक्के मुले आणि ५.४ टक्के मुलींनी शाळा सोडली आहे.

राज्यातील केवळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सरकारी शाळांमध्ये संगणकाची सुविधा उपलब्ध आहे. सरकारी प्राथमिक शाळांमध्ये संगणक सुविधा नाही. त्यामुळे केंद्र सरकारचा जो अहवाल आला आहे, त्यात २० टक्के सरकारी शाळांमध्ये संगणकाची सुविधा आहे, असे म्हटले आहे ते चुकीचे नाही. येत्या काळात सरकार प्राथमिक शाळांमध्ये संगणक सुविधा देण्याचा विचार करू शकते.
शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT