Online Betting Games In India: 'महादेव बेटिंग अॅप'शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून सुरु असलेल्या तपासात अनेक मोठे खुलासे झाले आहेत, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत.
तरुणांमध्ये ऑनलाइन गॅम्बलिंग आणि सट्टेबाजीची क्रेझ वाढत आहे. गेल्या काही काळापासून इंटरनेटवर कॅसिनो वेबसाइट्समध्ये वाढ झाली आहे.
हे प्लॅटफॉर्म, जगभरातील कॅसिनो चाहत्यांना गेम ऑफर करण्याव्यतिरिक्त, त्यांना काही प्रलोभने देखील देतात. काही काळापासून भारतात परिस्थिती बदलत आहे. ऑनलाइन गॅम्बलिंग आणि सट्टेबाजी या दोन्हींबाबत देशात कठोर नियम आहेत.
देशात कडक कायदे लागू असूनही, काही राज्यांमध्ये सट्टेबाजी अजूनही कायदेशीर आहे. गोवा, सिक्कीम आणि दीव दमण या तीन राज्यांमध्येच ऑनलाइन गेमिंगला परवानगी आहे.
या राज्यांमध्ये तुम्ही पाहिजे तितका सट्टा खेळू शकता, परंतु ऑपरेटर्संना सट्टेबाजी ऑफर करण्यासाठी परवाना मिळणे आवश्यक आहे. घटनेनुसार, बेटिंग आणि जुगार हे राज्याचे विषय आहेत आणि त्यांना परवानगी देण्यासाठी राज्येच कायदे करु शकतात.
गोवा (Goa), दमण आणि सिक्कीम ही अशी राज्ये आहेत, ज्यांनी कायदा बदलून ऑनलाइनला कायदेशीर परवानगी दिली आहे.
भारतात (India) सट्टेबाजीबाबत अनेक कठोर नियम आहेत. 1867 च्या ‘पब्लिक गॅम्बलिंग अॅक्ट’ अंतर्गत, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे किंवा सट्टेबाजी करणे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे.
हा कायदा ऑनलाइन बेटिंगसह सर्व प्रकारच्या गेमिंगला लागू होतो. तुम्ही ऑनलाइन सट्टा खेळताना आढळल्यास, तुम्हाला ‘पब्लिक गॅम्बलिंग अॅक्ट’ अंतर्गत कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.