Online betting mastermind Babu Khemani arrested Dainik Gomantak
गोवा

सट्टेबाजीचा 'मास्टरमाईंड' बाबू खेमानीला मुंबईतून अटक, छाप्यांत सात जण ताब्यात; कोट्यवधींची उलाढाल

Online betting mastermind Babu Khemani arrested: ऑनलाइन सट्टेबाजीचा मास्टरमाईंड बाबू खेमानीच्या अखेर मुंबईत रायपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्‍या अडीच वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा आणि ऑनलाइन सट्टेबाजीचा मास्टरमाईंड बाबू खेमानीच्या अखेर मुंबईत रायपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सट्टेबाजी प्रकरणी मुंबई आणि गोवा येथे एकाच वेळी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी खेमानी याच्यासह सात प्रमुख आरोपींना अटक केली.

आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण २७ जणांना अटक झाली आहे. आयपीएल क्रिकेट सुरू असल्याने त्याचा फायदा उचलण्याचा त्याने प्रयत्न सुरू केले होते. तो देशभरातील बुकीज व एजंट्समार्फत लोकांपर्यंत आयडी आणि पॅनेल पोहोचवत असे.

छत्तीसगढ येथील रायपूरच्या रेल्वेस्थानकाच्या परिसरात पोलिसांना या प्रकरणाचा १३ रोजी सुगावा मिळाला. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी रात्र गस्तीच्यावेळी एका संशयितास ताब्यात घेतले होते, कारमध्ये बसून तो सट्टा खेळत असल्याचे आढळले होते.

त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर गुन्हे प्रतिबंध व सायबर युनिटच्या पथकाने ओडिसा आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांत शोधमोहीम सुरू केली. पोलीस उपायुक्त स्मृतिक राजनाला यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईतून बाबू खेमानीसह रोहित सिंह आणि विशाल कश्यप यांच्या मुसक्या आवळल्या. तर गोवा येथील ऑनलाइन पॅनेलवर कारवाई करून वैभव खंडेलवाल, लक्ष्मण ढोबरे, रणजीत कुमार पासवान आणि आशिष जाधव या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

६० लाखांचे साहित्य जप्त

ताब्यात घेतलेल्या टोळीकडून जप्त केलेल्या साहित्याची किंमत ६० लाख रुपयांहून अधिक आहे. यामध्ये मोबाईल फोन, एलईडी टीव्ही, वाय-फाय राउटर, लॅपटॉप, रोख रक्कम आणि एक बीएमडब्ल्यू कार अशा मुद्देमालाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL Football: जिगरबाज एफसी गोवाची बरोबरी, पिछाडीवरून गतविजेत्या मोहन बागानला 1-1 असे रोखले

Goa Virgal History: नौदल युद्ध ते गोधन रक्षण! वीरगळांवरील शिल्पांतून उलगडतो गोव्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

Sexual Harassment: 'इन्स्टाग्राम'वरून मैत्री करून युवतीला फसविणारा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी; तपास सुरू

Baga Beach Shack Violence: कन्नड गाणी न लावल्याने धिंगाणा, बागा किनारी शॅकवर मद्यधुंद पर्यटकांकडून तोडफोड

Cricket Betting Goa: आसगाव येथे आयपीएलच्या सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा, सातजणांना अटक; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT