Onions Dainik Gomantak
गोवा

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Goa Vegetable Rates: दोन दिवसांपूर्वी ६० रुपये किलो असलेल्या कांद्याचे दर आता ८० रुपयांवर पोहोचले आहेत. सध्‍या लसूण वगळता अन्य भाज्यांचे दर नियंत्रणात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Onion Prices Witness Sharp Increase in Two Days At Goa

डिचोली: दैनंदिन आहारातील घटक असलेला कांदा आता सामान्य गृहिणींच्या डोळ्यांतून अश्रू काढण्याची शक्यता आहे. कांदा पुन्हा एकदा दरवाढीच्या दिशेने वाटचाल करत आहे. दोन दिवसांपूर्वी ६० रुपये किलो असलेल्या कांद्याचे दर आता ८० रुपयांवर पोहोचले आहेत.

काल बुधवारी डिचोलीच्या आठवडी बाजाराच्या दिवशीच ही दरवाढ लागू झाली आहे. पावसामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने कांदा महाग झाला आहे. कांद्याची आणखी दरवाढ होणार आहे, असे संकेत डिचोली बाजारातील काही भाजीविक्रेत्यांनी दिली.

चतुर्थीनंतर २० रुपयांनी घसरला होता दर

डिचोलीच्या बाजारात अधिकाधिक भाजी ही कर्नाटक राज्यातून येते. सध्‍या लसूण वगळता अन्य भाज्यांचे दर नियंत्रणात आहेत. मात्र कांदा पुन्हा महाग झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर कांदा महाग होऊन ८० रुपये किलोवर पोहोचला होता. परंतु चतुर्थीनंतर नवीन कांदा बाजारात आल्यानंतर जवळपास २० रुपयांनी तो स्वस्त झाल. राज्‍यात सध्‍या सुरू असलेल्‍या दिवाळी सणात मागील दोन दिवसांपर्यंत कांद्याचे दर स्थिर होते. मात्र काल बुधवारपासून पुन्हा तो ८० रुपयांवर पोहोचला आहे. त्‍यामुळे नागरिकांची विशेषत: गृहिणींची चिंता आणखी वाढली आहे.

कर्नाटकात कोसळलेल्‍या मुसळधार पावसाचा कांदा पिकाला फटका

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात पावसाने कहर केला आहे. पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याची आवक घटली आहे. पावसाचा कहर सुरूच राहिल्यास कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही बाजारातील काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. सध्या अन्य भाज्यांचे दर स्थिर असले, तरी पावसामुळे भाज्यांचा तुटवडा निर्माण होऊन भाज्या महागण्याची शक्यता आहे, असे रमेश रेड्डी आणि अन्य विक्रेत्यांनी सांगितले. गेल्‍या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्‍याने लोकांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT