Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: माड कोसळून महिला जखमी, साळगावात भिंत कोसळली; गोव्यात पावसाचे धुमशान, 3 दिवस ऑरेंज अलर्ट

Goa IMD Orange Alert: मच्छीमारांनीही खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात कालपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून राज्यातील बहुतांश भागात दमदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविली असून तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.

मडगावात झाड पडून एक महिला जखमी झाली. राज्यात दमदार पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना शक्यतो पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये, असा सल्ला गोवा वेधशाळेने दिला आहे. मच्छीमारांनीही खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

डिचोलीत बागायतींचे लाखोंचे नुकसान

कोसळधार पावसाचा डिचोलीतील व्हावटी भागाला मोठा फटका बसला असून येथील कुळागारांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. पावसाच्या तडाख्यात बागायती पिकाची हानी झाली असून, बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत पंचायतीला कळवूनसुद्धा पंचायत किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानीची पाहणी करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी व्यथा व्हावटी येथील बागायतदारांनी मांडली.

साळगाव येथे भिंत कोसळली

जोरदार पडणाऱ्या पावसामुळे क्रुझवाडो, साळगाव येथे एका घराची भिंत कोसळून दीड लाखाचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली.

मडगाव ते बाणावली प्रवास असा करत असताना मारिया हॉलजवळ एक माड अचानक कोसळल्याने एक दुचाकीचालक महिला जखमी झाली. या महिलेला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT