Mining In Goa  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Mining: अडवलपाल आणखी एका खाणीच्या छायेत; ग्रामस्थांत धास्ती

Bicholim Mining: डिचोली तालुक्यातील अडवलपाल गावाला टेकून असल्यामुळे आणखी एका खाणीचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत, यामुळे येथील लोक धास्तावले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: लीज क्षेत्र व अन्य काही मुद्यांवरून खाणपट्ट्यात असंतोष धुमसत असताना आता डिचोलीतील कुडणेसह उत्तर गोव्यातील तीन खाणींना 'ईसी' मिळाली आहे. राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने कुडणे-करमल, कुडणे-सोनशी आणि थिवी-पीर्ण खाण पट्ट्याअंतर्गत येणाऱ्या तीन खाणींना हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या खाणी सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात राज्य मूल्यांकन तज्ज्ञ समितीने या तिन्ही खाणींना पर्यावरणीय मान्यतेसंदर्भातचा प्रस्ताव पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडे पाठवला होता. दरम्यान, थिवी-पीर्ण खाण पट्टा बार्देश तालुक्यात येत असला तरी या पट्ट्याअंतर्गत येणारी खाण डिचोली तालुक्यातील अडवलपाल गावाला टेकून असल्यामुळे आणखी एका खाणीचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत, यामुळे येथील लोक धास्तावले आहेत.

यापूर्वी येथील शेती बागायतींची मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागायती नष्ट झाल्या आहेत. शेतजमिनी खाण मातीत पुरल्या आहेत. त्यामुळे येथील कृषी संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असे ग्रामस्थांचा दावा आहे. वेळीच याला विरोध न केल्यास उरल्यासुरल्या शेती बागायतींवरही परिणाम होण्याची धास्ती त्यांना वाटते.

आणखी एक खाण

'थिवी-पिर्ण खाण ब्लॉक' जरी बार्देश तालुक्यात येत असला तरी या खाणीचा डिचोलीतील अडवलपाल गावावर प्रभाव राहणार आहे. अडवलपालमधील कोळमवाड्याच्या माथ्यावर सध्या 'फोमेंतो'ची खाण सुरु झाली आहे. त्या खाणीला लागूनच 'मेसर्स काय इंटरनॅशनल' कंपनीची खाण येत आहे. त्यामुळे अडवलपाल गावाच्या मानगुटीवर आता सीमेबाहेरील खाणरुपी 'भूत' बसणार आहे, अशी भीती अडवलपालच्या जनतेमधून व्यक्त होत आहे.

गावाच्या अस्तित्वाला धोका

अडवलपाल आणि जवळच्या केळ गावच्या डोंगरावर असलेल्या खाणीमुळे येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. शेती-बागायती नापीक बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुढील ५० वर्षांसाठी खाण व्यवसाय सुरू होत असल्याने केळ गावासह अडवलपालच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती माजी सरपंच प्रेमानंद साळगावकर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या तीन खाणींना ‘ईसी’

1) कुडणे खाण ब्लॉक अंतर्गतच्या 'जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड' कंपनीच्या खाणीला ३८ हेक्टर क्षेत्रात मिळून प्रतिवर्ष ०.५ मिलीयन टन खनिज उत्पादन करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

2) कुडणे खाण ब्लॉक-७ अंतर्गतच्या 'वेदांता'च्या खाणीवर ७५ हेक्टर क्षेत्रात मिळून प्रतिवर्ष ०.५ मिलीयन टन खनिज उत्पादन करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

3) थिवी-पीर्ण खाण पट्ट्याअंतर्गत 'मेसर्स काय इंटरनॅशनल' कंपनीच्या खाणीवर ७२ हेक्टर क्षेत्रात मिळून प्रतिवर्ष ०.३ मिलीयन टन खनिज उत्पादन करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

4) स्थानिकांना रोजगाराची संधी देतानाच खाणपट्टा भागातील जनतेच्या समस्यांचा विचार करा. तसेच आवश्यक सोपस्कार पूर्ण करावे या अटींवर या तिन्ही खाणींना 'ईसी' मंजूर झाला आहे. या खाणींच्या जनसुनावणीवेळी मोठासा विरोध झाला नव्हता, त्यामुळे 'ईसी' मिळण्याचा मार्ग सुकर झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fight Video Viral: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT