Pilgaon Sarpanch: खाण वाहतूक विरोध भोवला? पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी यांची उचलबांगडी

Bicholim Mining Issue: आपल्याला सरपंचपदावरून हटविण्यामागे राजकारण असल्याचे मोहिनी जल्मी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता स्पष्ट केले आहे.
Pilgaon Sarpanch: खाण वाहतूक विरोध भोवला? पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी यांची उचलबांगडी
Pilgaon SarpanchDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी यांची अखेर सरपंचपदावरून उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ४ विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला आहे.

पिळगाव येथील शेतकऱ्यांचे खाणी विरोधात जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनात मोहिनी जल्मी या सुरवातीपासूनच सक्रिय होत्या. या घडामोडीमुळे त्यांना सरपंचपद गमवावे लागले आहे. यामुळे गावात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सातपैकी चार सदस्यांनी जल्मी यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पंचायत कार्यालयात मंडळाची बैठक झाली.

Pilgaon Sarpanch: खाण वाहतूक विरोध भोवला? पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी यांची उचलबांगडी
Panchayat Goa: कधी देणार आमचे मानधन? पाच महिन्यांपासून गोव्यातील पंचायत सदस्य प्रतीक्षेत, खर्च भागवणे झाले मुश्किल

या बैठकीला अविश्वास ठराव आणणारे उपसरपंच सुनील वायंगणकर, उमाकांत परब गावकर, चेतन खोडगीणकर आणि ॲड. शर्मिला वालावलकर हे चार सदस्य उपस्थित होते. सरपंच जल्मी यांच्यासह स्वप्नील फडते व उज्ज्वला बेतकीकर हे गैरहजर राहिले. बैठकीत ठरावावर चर्चा होऊन हा ठराव ४ विरुद्ध ० मतांनी संमत झाला. निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास कार्यालयाचे अधिकारी नवनाथ आमरे उपस्थित होते.

हल्लीच पिळगावातील ग्रामस्थांनी खाण वाहतुकीविरोधात आवाज उठवला होता. खाण वाहतूक अडवून ठेवली होती. स्थानिक पंच या नात्याने सरपंच जल्मी यांनीही ग्रामस्थांना पाठिंबा देत यात सक्रिय भाग घेतला होता.

जल्मी यांचा दावा

आपल्याला सरपंचपदावरून हटविण्यामागे राजकारण असल्याचे मोहिनी जल्मी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com