125 वर्षांची कोकणी कला लंडनमध्ये! वर्षा उसगावकर यांनी सादर केलं 'तियात्र'; Video Viral

Varsha Usgaonkar tiatr: गोव्यातील पारंपरिक नाट्यकला प्रकार 'तियात्र' चा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे
Konkani tiatr London
Konkani tiatr LondonDainik Gomantak
Published on
Updated on

Varsha Usgaonkar Konkani tiatr London: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि गोव्याच्या कलाविश्वातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या वर्षा उसगावकर यांनी सध्या एका खास कारणामुळे लक्ष वेधून घेतले आहे. गोव्यातील पारंपरिक नाट्यकला प्रकार 'तियात्र' चा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात त्या लंडनमध्ये सादरीकरण करताना दिसत आहेत.

'देवाचें नांव जीतां हांव' ची लंडनमध्ये प्रस्तुती

वर्षा उसगावकर यांनी 'देवाचें नांव जीतां हांव' (Devachem Nanv Jietam Hanv) या प्रसिद्ध तियात्रमधील एका भागाचे सादरीकरण लंडनमध्ये केले. या व्हिडिओमध्ये त्या तियात्रमधील एक गाणे गाताना दिसत आहेत.

मारियानो फर्नांडिस लिखित या तियात्राची मध्यवर्ती संकल्पना प्रेम, कौटुंबिक संबंध, विश्वास आणि विश्वासघात या भोवती फिरते, तसेच गोव्यातील समाजातील आंतर-धर्मीय एकतेवरही तो प्रकाश टाकतो. या तियात्राची कथा जॅकोब, त्याची हिंदू पत्नी वर्षाआणि त्यांची मुले ध्रुवआणि मॅगी यांच्याभोवती फिरते.

Konkani tiatr London
Tiatr Artist: गोव्याची 'परंपरा' राखायची असेल तर समर्पित नाट्यगृहे गरजेची, 'तियात्र' कलाकारांची जागेअभावी परवड

'तियात्र' कलेचा वारसा

तियात्र ही कोंकणी भाषेतील एक लोकप्रिय संगीत नाट्यकला आहे, जी १२५ वर्षांहून अधिक जुनी आहे. ती नाटक, संगीत आणि नृत्याचा मिलाफ म्हणून ओळखली जाते. या कला प्रकारात मुख्य नाटक लहान अंकांत विभागलेले असते, ज्यामध्ये स्वतंत्र गीते समाविष्ट असतात.

या गाण्यांमधून अनेकदा सध्याच्या सामाजिक आणि राजकीय समस्यांवर भाष्य केले जाते.वर्षा उसगावकर यांच्या या लंडनमधील सादरीकरणामुळे गोव्याच्या पारंपरिक तियात्र कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com