Deadbody Found in Curchorem Dainik Gomantak
गोवा

कुडचडेत सापडला आणखी एक मृतदेह

दारुच्या नशेत मृत्यू झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज

सुशांत कुंकळयेकर

कुडचडे : करमणे दाबाळ येथील रुपा शेट पारकर या महिलेच्या सावर्डे येथे झालेल्या खुनाची घटना ताजी असतानाच आज बुधवारी कुडचडे अग्निशमन दल कार्यालयाच्या जवळ असलेल्या शेतीत आणखी एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परत एकदा कुडचडे शहर चर्चेत आले आहे.

सापडलेला मृतदेह 34 वर्षीय पुरुषाचा असून तो आज बुधवारी सकाळी स्थानिकांना आढळून आल्याने ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. कदाचित हाही खुनाचाच प्रकार असावा अशी शंका काही जणांनी व्यक्त केली.

दरम्यान पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ज्याचा हा मृतदेह आहे त्याला दारू प्यायचे व्यसन होते. दारू प्यायलेल्या अवस्थेत तो या भागात पडला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे 5 मे रोजी रूपा हिचा खून करून गांधीनगर सावर्डे येथील मुख्य रस्त्याच्या शेजारी आड रस्त्यावर फेकून देण्यात आला होता. तो मृतदेह दुसऱ्या दिवशी 6 मे रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास दृष्टीस पडल्याने कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला.

रूपा हिचा मृत्यू डोक्यावर गंभीर वारामुळे झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाल्याने कुडचडे पोलिसांनी त्यादृष्टीने तपस करण्यास सुरुवात केली होती. याप्रकरणी हुसेन कासीम खान (40) या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT