Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Toolkit Goa: घर का भेदी लंका ढाए! एक मंत्रीच करतोय गोवा सरकारची बदनामी; पर्यटनमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

Toolkit To Defame Goa: पर्यटन क्षेत्राविषयी समाजमाध्यमे आणि राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांतून अत्यंत वाईट चित्र निर्माण केल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Toolkit To Defame Goa

पणजी : राज्य सरकार आणि गोव्याची बदनामी करण्यासाठी सरकारातील एक मंत्री वेगवेगळ्या आयुधांचा (टूल-किट) वापर करत असल्याचा आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह तीन मंत्र्यांनी काल बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधी गटाचा हा डाव उघड करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू असून, पक्षश्रेष्ठींकडे हे प्रकरण नेले जाणार आहे.

गोवा मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी काल फेटाळून लावल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारात सर्व काही आलबेल नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. मंत्रिमंडळातील एखादा मंत्रीच मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत असल्याचे कृत्य घडत असेल तर ती बाब अत्यंत गंभीर आहे.

राज्यातील पर्यटन उद्योगाविरोधातील नकारात्मक मोहीम राबवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर होत असल्याचे लक्षात आल्याने मंत्री खंवटे यांनी शोध घेतला असता त्यांना त्यामागील खरा सूत्रधार कोण हे कळून आले आहे.

मंत्री खंवटे यांनी त्या मंत्र्याचे खासगीत मुख्यमंत्र्यांना नाव सांगितलेही असेल, मात्र त्यामुळेच त्यांनी केलेल्या आरोपाची दखल पक्षश्रेष्ठींनाही घ्यावी लागली आहे. आता पक्षश्रेष्ठींकडून काय पावले उचलली जातात, हे लवकरच कळेल. अन्यथा तेही आत्तापर्यंतच्या पेल्यातील वादळाप्रमाणे ठरले काय, अशी अटकळ बांधली जाऊ लागली आहे.

आणखी तीन मंत्र्यांनी ओढली खंवटेंची 'री'

एकंदर सरकारच्याच बदनामीचा हा प्रयत्न असल्याचे समोर आल्याने मंत्री खंवटे यांनी थेट मंत्रिमंडळात ही बाब बोलून दाखविली. त्यांनी दिलेल्या माहितीला इतर तीन मंत्र्यांनीही दुजोरा दिल्याने त्यांच्या एकंदर सांगण्याला आपोआपच वजन प्राप्त झाले आणि त्यामागील गांभीर्यही समोर आले. बदनामी करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या त्या मंत्र्याचे नाव मात्र उघड करण्यास खंवटे यांनी नकार दिला.

नोकरीविक्री प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर झाले होते आरोप

१) नोकरीविक्री घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबावर आरोप झाले. त्या आरोपांची तक्रारही पक्षश्रेष्ठींकडे पोहोचली. अशा घटनांची दखल पक्षश्रेष्ठींकडून घेतली जावी असे वाटणे साहजिक आहे. परंतु तसे झाले नाही.

२) पर्यटन क्षेत्राविषयी समाजमाध्यमे आणि राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांतून अत्यंत वाईट चित्र निर्माण केल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. समाजमाध्यमांवर जे चित्र निर्माण करण्यात आले, त्यामागेही एका मंत्र्याचाच हात असल्याचे खंवटे यांचा दावा आहे.

३) शिवाय राज्यातील मंत्र्यांचे रिपोर्टकार्ड व्यवस्थित नसल्याने मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पावसाळी अधिवेशनानंतर ज्या पद्धतीने सतत होत राहिली, ती वर्ष संपले तरी अजूनही कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT