Vasco Accident Dainik Gomantak
गोवा

Vasco Accident: कारवरील ताबा सुटून वास्को येथील युवक ठार

Goa Accident: चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरून उंचावरून बाजूला सखल भागात कोसळली

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को, ता. ४ (प्रतिनिधी) : शांतीनगर-वास्को महामार्गावर शनिवारी रात्री वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात संज्योत बोरकर (वय १९ वर्षे, रा. वास्को) याचा मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र डेव्हिड क्रुझ (वय २० वर्षे) आणि सहर्ष भोसले (वय २४ वर्षे) हे दोघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मांगोर हिलहून स्विफ्ट कारने (क्र. जीए-०१-ई-६३९८) दाबोळीच्या दिशेने जात असताना शांतिनगर येथे पोचताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरून उंचावरून बाजूला सखल भागात कोसळली. त्यावेळी मोठा आवाज होताच आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली असता, एक कार कोसळलेली दिसली.

यावेळी कारचा चक्काचूर झाला. त्या कारमध्ये अडकलेल्या तिघा जखमींना बाहेर काढून चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना गोमेकॉत पाठविण्यात आले. संज्योत बोरकर याचा गोमेकॉत मृत्यू झाला. चालक डेव्हिड क्रूझ, सहर्ष भोसले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

अपघातात मृत्यू पावलेला वास्को नॉन-मॉन येथील संजोग बोरकर याच्यावर रविवारी सकाळी गोमेकॉत शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी वास्को खारीवाडा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जखमी कारचालक डेव्हिड क्रूझ याच्यावर इस्पितळात उपचार करून घरी पाठविण्यात आले. पुढील चौकशी वास्को येथील पोलिस हवालदार अनंत पवार करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT