One killed, one injured in car-bike accident in Arlem area  Dainik Gomantak
गोवा

आर्लेम परिसरात कार-दुचाकीच्या अपघातात एकाचा बळी, एक जखमी

कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : आर्लेम येथील बगल रस्त्यावर दुचाकी आणि कारमध्ये अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अपघातास्थळी मृत झालेल्या मयताचे नाव हेमंत चोपडे असे आहे. एका कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. या बरोबरच त्याच्या मागे बसलेला भाऊ हरीश चोपडे हा गंभीर झखमी झाला आहे. त्याला बांबोळी (Bambolim) येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही झुवारीनगर वास्को येथे राहणारे असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघाताला (accident) कारणीभूत ठरलेल्या चंद्रशेखर तलवाडे या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, काल बेले नावेली येथे रस्ता ओवलांडणाऱ्या मुलाला कारची धडक बसल्याने त्याचे निधन झाले आहे. अपघातादरम्यान बघ्यांनी गर्दी केल्यामुळे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली होती. या प्रकरणी मडगाव (Margao) पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंद केला आहे.

ही घटना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. नीरज बुधनवर हा सहा वर्षांचा मुलगा रस्ता ओलांडत असताना त्याला कारची धडक बसली. त्याला उपचारासाठी गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री उशिरा तिथे त्याचे निधन (Death) झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

SCROLL FOR NEXT