One injured in Gaur Attack  Dainik Gomantak
गोवा

धुलई धारबांदोडा येथे गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

धारबांदोडा परिसरात गव्यांचा खुलेआम संचार चालला असून धुलई - धारबांदोडा येथे आज शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सरकारी प्राथमिक शाळेजवळ गव्याची धडक बसून दुचाकीस्वार जखमी झाला.

दैनिक गोमन्तक

फोंडा : धारबांदोडा परिसरात गव्यांचा खुलेआम संचार चालला असून धुलई - धारबांदोडा येथे आज शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सरकारी प्राथमिक शाळेजवळ गव्याची धडक बसून दुचाकीस्वार जखमी झाला. जखमीवर पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. (One injured in Gaur Attack)

लोकवस्तीत गव्याचा संचार वाढल्याने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक गवा रस्त्यावर आल्याने या दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकीस्वाराच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्या असून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या प्रकारात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. शाळेजवळ गव्यांचा संचार वाढल्याने पालकांत चिंता पसरली आहे.

दरम्यान, राज्यात गुन्हेगारीप्रमाणे यंदा गेल्या पाच महिन्यात रस्ता अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 15.91 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही वाढले असून त्यामध्ये दुचाकी चालक व सहचालकांचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे. मे अखेरीपर्यंत 1348 अपघात घडले. त्यात 110 जणांना जीव गमावावा लागला आहे त्यामध्ये 78 दुचाकीस्वार व 22 पादचाऱ्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नवी कोरी गाडी घातली समुद्रात! सुरक्षारक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, हणजूण किनाऱ्यावर पर्यटकाची फजिती; Watch Video

Tillari Accident: ..तिलारीची सहल ठरली अखेरची! ताबा सुटल्याने टेम्पो-दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Goa Shipyard: सांकवाळ येथील जमीन मिळणार गोवा शिपयार्डला, 81 कोटींना मंजुरी; सरकारला बसणार 34 कोटींचा फटका

Mhaji Bus: 'म्हजी बसमुळे अपघात - वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल', CM सावंताचे प्रतिपादन; 4 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण

Chorla Ghat: चोर्लाघाट ठरतोय ‘मृत्‍यूचा सापळा’! ठिसूळ झाडे, दरडी; प्रवाशांचा जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT