One held for kidnapping Goan Girl Dainik Gomantak
गोवा

अठरा वर्षांच्या मुलीचे गोव्यातून अपहरण; संशयिताला नाशिकमधून अटक

कोलवाळ पोलिसांची कामगिरी; पिडितेला आणले गोव्यात

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

म्हापसा : थिवी परिसरातील एका अठरा वर्षीय मुलीला कथित फुस लावून तिचे अपहरण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी 25 वर्षीय, मूळ नेपाळच्या युवकाला अटक केली. सदर मुलगी 11 जूनपासून आपल्या घरातून बेपत्ता होती. कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अनिल सुनार (रा. आकय-म्हापसा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पिडितेच्या मोठ्या बहिणीने याप्रकरणी पोलिस तक्रार दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, तिच्या बहिणीचे एका अनोळखी व्यक्तीने अपहरण केले असून तिला अज्ञात जागी ठेवले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. पोलिसांना तपासावेळी या पिडित बेपत्ता अपहरण मुलीचे मोबाईल लोकेशन हे नाशिक, महाराष्ट्रात दाखवत होते. जे अंबाड पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येते.

त्यानुसार, दि. 18 जून रोजी, विशेष पथकाची स्थापना करण्यात आली, त्याचे नेतृत्व हेड कॉन्स्टेबल अजय गांवकर यांनी केले. यावेळी गोवा पोलिसांनी अंबड पोलिसांच्या सहाय्याने शोध मोहिम सुरु केली. यावेळी चुंचाळे, नाशिक येथे संशयित राजू सुनार यास ताब्यात घेतले. तसेच बेपत्ता अपहरण झालेल्या मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली. या दोघांना गोव्यात आणण्यात आले. याप्रकरणी संशयिताला भादंसंच्या कलम 365 अन्वये अटक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

Chimbel Unity Mall: चिंबल 'युनिटी मॉल'चा फैसला 14 तारखेला! सत्र न्यायालयात 'जीटीडीसी' आणि याचिकाकर्त्यांमध्ये जोरदार युक्तिवाद

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

SCROLL FOR NEXT