Bail Dainik Gomantak
गोवा

कळंगुट रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणी एकाला 'जामीन'

सुनिल भोमकर याने अर्ज मागे घेतला.

दैनिक गोमन्तक

पणजी: कळंगुट येथील सोझा पॉल रेस्टॉरंट तोडफोडप्रकरणी संशयित गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला तर सुनिल भोमकर याने अर्ज मागे घेतला. या दोघांच्या अर्जावरील सुनावणी पूर्ण होऊन त्यावर आज निकाल देण्यात आला. निकाल देण्यापूर्वी खंडपीठाने अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे संकेत दिले. त्यामुळे जर त्यांना ते मागे घ्यायचे असल्यास ते घ्यावेत, अशी संधी दिली होती

या प्रकरणातील इतर काही संशयित अजूनही फरारी आहेत. क्राईम ब्रँचने या आरोपपत्र सादर केले आहे मात्र पूर्ण तपास झालेला नाही. या प्रकरणातील पुरवणी आरोपपत्र फरारी संशयितांना अटक केल्यानंतर सादर केले जाणार आहे. या प्रकरणातील दोघे संशयित वगळल्यास इतर अटक झालेले संशयित जामिनावर आहेत. या घटनेमागील हे दोघे संशयित मुख्य सूत्रधार असल्याने त्यांना जामीन मिळाल्यास फरारी संशयितांचा शोध घेणे कठीण होणार असल्याची बाजू मांडण्यात आली होती. म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने या दोघांचा दोनवेळा जामीन फेटाळला आहे. या रेस्टॉरंट तोडफोडप्रकरणीचा तपास सुरू असताना संशयितांनी जलदगती न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT