Sampark programme on One District One Product held in Goa 
गोवा

'गोवा काजू'ला लवकरच 'जीआय टॅग' तर, 'युनिटी मॉल' वैभवात टाकेल भर; ODOP त महत्वाची माहिती

जीआय टॅगमुळे गोव्यातील काजूचा नावलौकिक आणि बाजारपेठ तर वाढेलच, शिवाय एकूणच काजू उद्योगाला ही मोठी चालना मिळेल.

गोमन्तक डिजिटल टीम

'गोवा सरकारने स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि राज्यातील काजू उद्योगाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. 'गोवा काजू'ला जीआय दर्जा देणे, 'युनिटी मॉल'ची स्थापना आणि 'एक तालुका एक उत्पादन' योजनेची अंमलबजावणी या उपक्रमांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.'

असे गोवा सरकारच्या उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालयाच्या संचालिका स्वेतिका सचान यांनी आज पणजी येथे झालेल्या ओडीओपी संपर्क कार्यक्रमात म्हणाल्या. तसेच, 'गोवा काजू'ला लवकरच जीआय टॅग (Geographical Indication) मिळणार असल्याची माहिती सचान यांनी दिली.

वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (One District One Product) योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने संपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सचान बोलत होत्या.

उत्तर गोवा जिल्ह्यासाठी ओडीओपी योजनेत काजूला पहिले उत्पादन, तर फेनीला दुसरे उत्पादन म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच दक्षिण गोवा जिल्ह्यात फेणीला पहिले उत्पादन आणि काजूला दुसरे उत्पादन म्हणून मान्यता मिळाली आहे.

सरकारने सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केली असून, या प्रसिद्ध स्थानिक उत्पादनाच्या अधिकृत ब्रँडिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. जीआय टॅगमुळे गोव्यातील काजूचा नावलौकिक आणि बाजारपेठ तर वाढेलच, शिवाय एकूणच काजू उद्योगालाही मोठी चालना मिळेल.

गोव्यातील हस्तकला, कला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार 'युनिटी मॉल'ची स्थापना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत आहे. युनिटी मॉल पर्यटकांना गोव्याचे वैभव अनुभवण्यासाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन ठरेल.

स्थानिक उत्पादनांची व्याप्ती वाढविण्याची गरज ओळखून गोवा सरकार 'एक तालुका एक उत्पादन' योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील प्रत्येक तालुक्यातील विशिष्ट कृषी उत्पादने आणि हस्तकला ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.

प्रत्येक तालुक्याशी निगडित उत्पादनांच्या श्रेणीमध्ये विविधता आणून, स्थानिक उद्योगांना बाजारपेठ मिळवून देणे आणि राज्यात शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT