One committed suicide by hanging himself in canacona dainik Gomantak
गोवा

Goa Suicide Case: किंदळे-काणकोण येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

किंदळे-काणकोण येथील तुळशीदास काणकोणकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दैनिक गोमन्तक

किंदळे-काणकोण येथील तुळशीदास काणकोणकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्‍चात दोन मुलगे व पत्नी असा परिवार आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली

तुळशीदास हे चावडीवर सुमो गाडीने भाडी मारत असत. काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या कचरा उचल वाहनाचे चालक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. मात्र, अनेक दिवस ते मानसिक दडपणाखाली होते. ते वेगळ्या खोलीत व त्यांची बायको, मुले वेगळ्या खोलीत झोपली होती.

मात्र, सकाळी उठल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याचे या प्रकारणाचा तपास करणारे काणकोण पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजित वेळीप यांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मडगाव जिल्हा इस्पितळात शवचिकित्सा करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'एलआयसी'ची अदानी उद्योग समूहात 34,000 कोटींची गुंतवणूक: सरकारचा दबाव की धोरणात्मक निर्णय? - संपादकीय

Goa Politics : खरी कुजबुज, गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण?

Super Cup 2025 : धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

"सरकारी नोकर भरतीत अन्याय नको", दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींकडून संताप व्यक्त; धो धो पावसातही मराठीप्रेमींचा निर्धार

SCROLL FOR NEXT