IIT Goa Protest in Sanguem Dainik Gomantak
गोवा

Sanguem IIT: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक; तिघांविरुद्ध वॉरंट

दैनिक गोमन्तक

गोवा: सांगे येथे आयआयटी विरोधात केलेल्या निदर्शनात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे तसेच कामात अडथळा आणल्याबद्दल तसेच जमिनीच्या सीमांकनाच्या कामाला धमकावल्याच्या आरोपाखाली 3 व्यक्तींच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.

(One arrested, warrant issued against 3 for obstructing and threatening surveyors in Sanguem IIT protest)

आंदोलकांपैकी एक जोसेफ फर्नांडिस याला कलम 186 (सार्वजनिक सेवकाच्या सार्वजनिक कार्यात अडथळा आणणे) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तर फिलिप वाझ, मारिया वाझ आणि स्विजेल क्रूझ यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे

तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले

सांगे येथील प्रस्तावित आयआयटी विरोधात सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. काल सोमवारी दुपारी दीड वाजता कोठार्ली येथे सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व्हे अधिकारी पोलिस बंदोबस्तात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना रोखले. पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी समजावूनही शेतकरी भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांत झटापट होऊन चार महिला शेतकरी जखमी झाल्या.

सांगे आयआयटी प्रकल्प साकार करण्यासाठी सर्व्हेक्षण अंतिम टप्यात पोहचले असून काल शेवटचे सहा पॉईंट मार्किंग करण्याचे शिल्लक होते. शेतकऱ्यांना ते पूर्ण करणार याची कल्पना असल्याने सुमारे शंभरेहून अधिक महिला वाट अडवून राहिल्या होत्या. तो अंदाज आल्याने पोलिस बळ वाढविण्यात आले होते. केपेचे उप अधीक्षक निलेश राणे यांच्या दिमतीला सांगेचे पोलीस निरीक्षक विनायक पाटील, केपेचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर, कुडचडेचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक आपला फोर्स घेऊन घटनास्थळी आले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी या आयआयटी प्रकल्पाला विरोध करत आहेत. शनिवारी नागवे आणि रविवारी वरकटोतील शेतकऱ्यांनी शेतजमिनीत जाऊन सरकारचा निषेध नोंदविला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT