Mapusa Crime News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime News: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाप्रकरणी एकाला अटक, म्हापसा पोलिसांची कारवाई

संशयित युवक हा 22 वर्षाचा असून त्याला मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. गोवा पोलीस आणि प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत आहेच, तरीही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसतेय. साधारणतः 8-10 दिवसांपूर्वी म्हापश्यात एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.

संबंधित शाळेच्या व्यवस्थापनानेच या शिक्षकाबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात पॉस्को तसेच बाल कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदही करण्यात आला होता.

या घटनेनंतर पुन्हा एकदा म्हापसा येथे अशीच एक घटना घडली आहे. एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सदर संशयित युवक हा 22 वर्षाचा असून मुलीचा विनयभंग प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. अशा घटना वारंवार घडत राहिल्यास राज्यातील महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतोय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

खरी कुजबुज: सुभाष यांचा कुंकळ्ळीत वाढला वावर!

VIDEO: "विराटने आणि मी आधीच ठरवलं होतं..." रोहित शर्माचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा, पाहा नेमकं काय म्हणाला 'हिटमॅन'

BJP MGP Alliance: फोंड्याचा निर्णय चर्चा करूनच, सद्यस्थितीत भाजप–मगो युती गरजेची- दामू नाईक

Election Commission: निवडणूक आयोग घेणार सज्जतेचा आढावा, विशेष बैठका घेणार; 7 ते 8 ऑक्टोबर दरम्यान गोवा दौरा

SCROLL FOR NEXT