Instagram Dainik Gomantak
गोवा

Offensive Religious Post: हिंदूंविषयी इन्स्टाग्रामवर अपमानास्पद पोस्ट, एकाला अटक

Vasco Crime News: हिंदूंविषयी अपमानास्पद धार्मिक पोस्ट केल्याप्रकरणी आरोपीला वास्को पोलिसांनी ताब्यात घेतलं

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: हिंदूंविषयी अपमानास्पद धार्मिक पोस्ट केल्याप्रकरणी मंगळवार (दि. २२ ऑक्टोबर) रोजी एका आरोपीला वास्को पोलिसांनी ताब्यात घेतलं.

अटकेनंतर न्यू वाडो वास्को येथील मोहम्मद शरीफ मंडले नावाच्या या आरोपीने राज्यातील धार्मिक तेढ वाढवण्यासाठी तसेच समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी अशी पोस्ट केली असल्याची माहिती समोर आलीये.

या पोस्टमुळे हिंदू धर्मियांनी संताप व्यक्त केला होता. आरोपी मोहम्मद शरीफ मंडले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून BNS २०२३ च्या कलम १९२, १९६, आणि २९९ नुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वास्को पोलीस ठाण्याचे पीएसआय रोहन मडगावकर, पीआय कपिल नायक यांच्या व मडगाव डीवायएसपी सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

यापूर्वी देखील धार्मिक भावना दुखल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी जुळ्या बहिणींविरोधात तक्रार नोंदवली होती. उत्तर प्रदेशमध्ये कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या हत्येनंतर दोघींनी हिंदूविरोधी पोस्ट इन्स्टाग्रामवर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि एकाने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. पुढे तात्काळ याची दखल घेत गोवा पोलिसांनी दोघींच्या इन्स्टाग्राम खात्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: धारगळ दोन खांब ते आरोबा हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ

"ही राजकीय नाही, गोवा वाचवण्‍याची चळवळ"! निवृत्त न्‍या. फर्दिन रिबेलोंची हाक; वाचा घोषणापत्र आणि महत्वाचे मुद्दे..

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

SCROLL FOR NEXT