Secunderabad Vasco-Da-Gama Express: गोव्याला जाण्यासाठी आणखी एक एक्सप्रेस सुरु; जाणून घ्या वेळापत्रक

Secunderabad Vasco-Da-Gama Express: नव्या रेल्वे सेवेमुळे दोन राज्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे शिवाय पर्यटकांसाठी प्रवासाचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
Secunderabad Vasco-Da-Gama Express: गोव्याला जाण्यासाठी आणखी एक एक्सप्रेस सुरु; जाणून घ्या वेळापत्रक
Secunderabad Vasco-Da-Gama ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

Secunderabad - Vasco-Da-Gama Bi-Weekly Express

पणजी: तेलंगणातील सिकंदराबाद येथून गोव्यासाठी नव्याने रेल्वेसेवा सुरु झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ने गेल्या आठवड्यात या नव्या सेवेसाठी हिरवा कंदील दाखवला. ०९ ऑक्टोबरपासून सिकंदराबाद ते वास्को-द-गामा दरम्यान बायविकली (आठवड्यातून दोन दिवस) ही ट्रेन धावणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद ते वास्को-द-गामा ट्रेन आठवड्यातून दोन दिवस (बुधवार आणि शुक्रवार) धावेल. नव्या रेल्वे सेवेमुळे दोन राज्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे शिवाय पर्यटकांसाठी प्रवासाचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.

सिकंदराबाद-वास्को-द-गामा (ट्रेन क्रमांक 17039) बाय-विकली एक्सप्रेस ट्रेन दर बुधवारी आणि शुक्रवार सकाळी 10 वाजून 05 मिनिटांनी सिकंदराबाद येथून निघेल. ही ट्रेन दुसर्‍या दिवशी सकाळी 5.45 वाजता वास्को-द-गामाला पोहोचेल.

सिकंदराबाद ते वास्को-द-गामा (असे असतील थांबे) (Stops)

काचिगुडा: सकाळी 10.18

शादनगर: सकाळी 11.04

महबुबनगर: सकाळी 11.55

कुर्नूल शहर: दुपारी 1.38

गुंटल: 3.25 दुपारी

ब्राह्मणापल्ली: 3.43 दुपारी

धारवाड: संध्याकाळी 5.50

हुबली: 10.50 वाजता

मडगाव: सकाळी 3.50 वाजता

वास्को-द-गामा: सकाळी 5.45

Secunderabad Vasco-Da-Gama Express: गोव्याला जाण्यासाठी आणखी एक एक्सप्रेस सुरु; जाणून घ्या वेळापत्रक
Konkan Railway: कोकण रेल्वेचं दुपदरीकरण बारगळलं; महामंडळासमोर निधी उभारण्याचा प्रश्न; रेल्वे मंडळांनं फिरवली पाठ

तर, ही ट्रेन दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता वास्को-द-गामा येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी 6.20 वाजता सिकंदराबादला पोहोचेल.

वास्को-द-गामा ते सिकंदराबाद (असे असतील थांबे)

मडगाव: सकाळी 9.30

हुबली: दुपारी 12.50

धारवाड: 1.38 दुपारी

गुंटल: 3.25 दुपारी

कुर्नूल शहर: 11.48 दुपारी

महबुबनगर: 11.55 दुपारी

शादनगर: 12.18 दुपारी

काचिगुडा: दुपारी 12.30

सिकंदराबाद: सकाळी 6.20

एक्सप्रेसमध्ये किती डब्बे आहेत? (Coach Position)

सिकंदराबाद वास्को-द-गामा या एक्सप्रेस ट्रेनमध्ये रेल्वेने एकूण 21 आधुनिक एलएचबी डब्बे आहेत. ट्रेनमध्ये प्रथम एसी वर्ग, एसी 2-टियर, एसी 3-टियर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com