Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक; भाड्याच्या खोलीवर धाड टाकून पोलिसांची कारवाई

वानेली कोलवा येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून 5 किलो 100 ग्राम वजनाचा गांजा कोलवा पोलिसांनी जप्त केला आणि या प्रकरणात एकाला अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case : वानेली कोलवा येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून 5 किलो 100 ग्राम वजनाचा गांजा कोलवा पोलिसांनी जप्त केला आणि या प्रकरणात एकाला अटक केली आहे.

इरफान अहमद (20) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही कारवाई 30 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी करण्यात आली. या विषयीची माहिती प्राप्त झाल्यानंतर कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक थेरोंन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने भाड्याच्या खोलीची झडती घेतली.

यामध्ये त्यांना लाल रंगाच्या सुटकेसमध्ये प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवण्यात आलेला 100 ग्राम वजनाचा गांजा आढळून आला.

याची किंमत 5 लाख 10 हजार रुपये अशी आहे. अटक करण्यात आलेला संशयित आरोपी मायणा येथील रहिवाशी आहे. याप्रकरणी कोलवा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, देशभरातील अनेकांची 100 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एरिक हेन्री वाझ (37) याला जुने गोवा पोलिसांनी सोमवारी अटक केली. याबद्दलची माहिती उत्तर गोव्याचे एसपी निधीन वलसान यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT