Marigold Flowers Price Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Zendu Flower Market: फुले खाऊ लागली 'भाव', जाणून घ्या गोव्यातले दर

Marigold Flowers Price Goa: देवपूजा तसेच सुशोभीकरणासाठी लागणारी विविध प्रकारची फुले बाजारात दाखल झाली असून, त्‍यांना मोठी मागणी आहे. झेंडूची फुले १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: देशाच्‍या इतर भागांप्रमाणेच गोव्‍यातही दीपावली सणाचा उत्‍साह ओसंडून वाहत आहे. खरेदीलाही वेग आला आहे. देवपूजा तसेच सुशोभीकरणासाठी लागणारी विविध प्रकारची फुले बाजारात दाखल झाली असून, त्‍यांना मोठी मागणी आहे. झेंडूची फुले १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत.

झेंडूची केशरी आणि पिवळी अशा दोन्ही रंगांची फुले बाजारात विक्रीस दाखल झाली आहेत. ग्रामीण भागात १२० ते दीडशे तर शहरी भागात १५० ते २०० असा त्‍यांचा दर आहे. तसेच या फुलांची एक माळ ८० ते १०० रुपये दराने विकली जात आहे.

आवक कमी आणि मागणी वाढल्याने फुलांच्‍या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. पणजी बसस्थानक तसेच महानगरपालिकेच्या मार्केटमध्ये फुलांच्‍या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आता पुढे लक्ष्‍मीपूजन, भाऊबीज तसेच इतर सण असल्‍याने फुलांची मागणी आणखी वाढणार आहे.

सण, उत्‍सवांच्‍या वेळी राजधानी पणजीत सर्वसाधारणपणे दोन टन फुले खरेदी केली जातात. चतुर्थी, दसरा आणि दिवाळीच्‍या काळात मोठ्या प्रमाणात फुले खरेदी केली जातात. दिवाळीनिमित्त पणजीत सुमारे चार टन फुलांची विक्री होते. पणजी बसस्थानकाजवळील मार्केटमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. - दुर्गेश अगडी, पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa 2024: यंदाच्या इफ्फीत खास कार्यक्रमाचे आयोजन; 'इफ्फीएस्टा' करणार उपस्थितांचे मनरिजवण

IFFI Goa 2024: आता तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, असं करा बुकिंग आणि चित्रपटांचा आनंद घ्या

Goa Today's Live Update: कोट्यवधीचे नुकसान, सहकार क्षेत्रात वेगळ्या प्रकारचा फ्रॉड; मुख्यमंत्री सावंत

Mumbai: गोव्यातून चक्क मृत व्यक्ती आला मुंबईत मतदानाचा हक्क बजावायला, पुढं काय घंडलं? वाचा मतदान केंद्रावरील ड्रामा

Goa Opinion: "सोसायटी शोधायची तर चिटणीस वा अध्यक्ष शोधावा लागतो", गोव्यात सहकार क्षेत्र बळकट करणं का गरजेच?

SCROLL FOR NEXT