Accident At Suktali Mollem Highway Goa: Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: सुकतली मोले येथे महामार्गावर भरधाव टेम्पोची ट्रकला धडक; चालक जखमी

रस्त्याकडेला थांबला होता ट्रक

Akshay Nirmale

Accident At Suktali Mollem Highway Goa: धारबांदोडा तालुक्यातील सुकतळी मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व टेम्पो यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही. तथापि, टेम्पो चालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या महामार्गावर कर्नाटकचा ट्रक (KA 63 2212) रस्त्यावर लेनमध्ये थांबला होता. पाठीमागून भरधाव येत असलेल्या टेम्पोचालकाला याचा अंदाज आला नाही. टेम्पो (GA 06 T 3142) भरधाव असल्याने चालकाला नियंत्रण राखणे जमले नाही आणि वेगाने हा टेम्पो पाठीमागून ट्रकवर आदळला.

यात टेम्पोच्या पुढील बाजूचे पूर्ण नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकाला गंभीर दुखापत झालेली नाही. तथापि, त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कुळे पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे. पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT