Traffic Violations In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Police: वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून दंडाचा महाप्रसाद, सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच

पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे.

Pramod Yadav

Traffic Violations In Goa: नाताळ आणि नवीन वर्षाचे (X’mas & New Year) स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्था, कायदा व प्रशासन व्यवस्थित रहावे यासाठी गोवा पोलिस (Goa Police) सतर्क झाले आहेत. विशेषत: राज्यातील वाढलेल्या अपघातांची संख्या लक्षात घेता, पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. दक्षिण गोव्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic Violation) करणाऱ्यांविरोधात कारवाई करत दंड वसूल केला.

दक्षिण गोव्यात वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्तविद्यामाने कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 194 वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 60 हजार रूपयांचा दंड वसूल केला. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरूच राहणार आहे. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

गुरूवारी देखील अशाच पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली होती. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 151 वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई करत, 1 लाख 8 हजार 500 रूपयांचा दंड वसूल केला होता. वाहतुकीला शिस्त लागावी, राज्यातील अपघातांच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी राज्य सरकारने अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास थेट वाहनमालकाला अटक करण्याचा कठोर निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT