Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: ‘ओंकार’चा तोरसे, तांबोसेत धुमाकूळ ! लोकांच्या जमावामुळे गोंधळ; कामात अडथळा आणल्यास गुन्हे नोंदवण्याचा इशारा

Goa Elephant: हत्तीने शेतात नासधूस करू नये, यासाठी काहीजण जमाव करून उभे राहिले. त्यामुळे त्याची गंभीर दखल पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी घेतली.

Sameer Panditrao

मोरजी: ओंकार हत्तीने तोरसे भागात धुमाकूळ घातल्यानंतर बुधवारी रात्री ९ वाजता तो तांबोसेत पोहोचला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तो तेथेच होता. याठिकाणी भात-शेती, कवाथे, केळींची नासधूस केल्याचे गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर आणखी नासाडी होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली होती.

हत्तीने शेतात नासधूस करू नये, यासाठी काहीजण जमाव करून उभे राहिले. त्यामुळे त्याची गंभीर दखल पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी घेतली. जे कोणी ग्रामस्थ, शेतकरी अधिकाऱ्यांना अडथळे निर्माण करतील किंवा जमाव करतील, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे नोंदवून अटक करावी, असा सज्जड इशारा नाईक यांनी पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांना दिल्याने एकच खळबळ उडाली.

ओंकार हत्ती बुधवारी तोरसे गावातून रात्री ९ वा. तांबोसे गावात शेताच्या मळ्यात ठाण मांडून बसला. गुरुवारी सकाळी सुरुवातीपासून त्याने मोठ्या प्रमाणात शेतीची नासधूस करायला सुरुवात केली. वन खात्याचे अधिकारी रस्त्यावर वाहने ठेवून आरामात बसत आहेत.

मात्र, जे हंगामी कर्मचारी आहेत. ते शेतात जाऊन भर उन्हा-पावसात हत्ती कुठे जातो? हत्ती कुठे येतो? त्याची पाहणी करतात आणि त्यांच्या हातामध्ये फक्त ॲटम बॉम्बचे पाकीट दिलेले आहे आणि त्यांना कसल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत. हत्ती अंगावर धावून आला तर कर्मचाऱ्यांची सुरक्षा कोण करणार? असा प्रश्न स्थानिक पंच दया गवंडी यांनी उपस्थित केला.

लोकांच्या जमावामुळे गोंधळ

हत्ती पाहण्यासाठी आणि हत्तीला अडथळे निर्माण करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जमाव करतात आणि हा जमाव नियंत्रणात येत नसल्यामुळे पोलिसांनी आम्हाला सूचना केली. त्यामुळे आपण स्वतः या घटनास्थळी येऊन नागरिकांनी कोणत्याच प्रकारचे अडथळे आणू नयेत, जमाव करू नये, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! आर्थिक लाभ होईल, कौटुंबिक जीवनात सुख-समाधान लाभेल

Ronaldo in Goa: गोमंतकीयांना प्रतिक्षा 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ची! तिकिटांसाठी होतेय गर्दी; फुटबॉलप्रेमींत कमालीची उत्सुकता

K Vaikunth: हिंदी सिनेमासाठी 3 दशकांपेक्षा अधिक योगदान देणारे, महान गोमंतकीय सिनेमॅटोग्राफर 'के. वैकुंठ'

Nano Banana Image: नवीन ट्रेंड आला! AI वरून 15 रंगांच्या साड्यांमधले फोटो बनवले; गरजेचा, सुरक्षेचा विचार कुणी केला का?

Asia Cup 2025: आशिया चषकातील सुपर-4 फेरीचे सामने निश्चित, भारत 'या' संघांविरुद्ध भिडणार; संपूर्ण वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT