Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

Omkar Elephant Update: ‘ओंकार’ नामक हत्तीने गोव्याच्या हद्दीतून सिंधुदुर्ग या महाराष्ट्राच्या हद्दीत सीमोल्लंघन केल्यामुळे पेडणे वन विभागाच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: गेले पंधरा दिवस गोव्याच्या हद्दीत घुसलेल्या ‘ओंकार’ नामक हत्तीने काल १९ रोजी रात्री गोव्याच्या हद्दीतून सिंधुदुर्ग या महाराष्ट्राच्या हद्दीत सीमोल्लंघन केल्यामुळे पेडणे वन विभागाच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

मात्र, गोवा महाराष्ट्राच्या हद्दीवरील सिंधुदुर्ग भागातील लोक व सिंधुदुर्ग वन खात्याने जर या हत्तीला परत गोव्याच्या हद्दीत हूसकावून लावले, तर तो पुन्हा गोव्याच्या हद्दीत येण्याची शक्यता आहे.

या हत्तीने काल रविवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या हद्दीतून खोलबाग - नेतर्डे सिंधुदुर्ग - महाराष्ट्रमध्ये प्रवेश केला. तिथून हा हत्ती तिळारी पाटाच्या बाजूने चालत रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कळणे - सिंधुदुर्ग येथे पोहोचला. नंतर तेथून तो आज सकाळी उगाडे (सिंधुदुर्ग) या गावात पोहोचला. उगाडे हे गाव गोवा हत्तीपासून सुमारे नऊ किलोमीटरवर आहे.

४ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजता या हत्तीला गोवा हद्दीच्या पलीकडे असलेल्या नेतर्डे गावातून तेथील स्थानिक लोक व सिंधुदुर्ग वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गोव्याच्या हद्दीत हूसकावून लावले होते. तेव्हा त्याने कडशी - मोपा येथून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केले होता.

त्यानंतर गेले पंधरा दिवस हा हत्ती, कडशी, फकीर पाटो, उगवे आदी भागांत वावरत होता. या काळात त्याने दोन वाहनांचे तसेच बागायतीचे नुकसान केले होते. पेडणे वन विभागाचे कर्मचारी या हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: यंदा ऑगस्‍टपर्यंत 'रेड अलर्ट'विनाच पावसाळा! एकदाही नाही अतिवृष्टीचा इशारा; राज्यात अजूनही 29 टक्के तूट

DA Hike: महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाली तर बँक खात्यात किती रुपये जमा होणार? सरकारी कर्मचाऱ्यांनी सोप्या भाषेत समजून घ्या पगाराचे हे संपूर्ण गणित!

Dhyan Foundation: 11 कोटी अनुदान रखडल्‍याने 500 गुरांवर विस्थापनाची वेळ, स्थलांतरासाठी 'ध्‍यान'ने मागितली परवानगी

RGP State President: 'आरजीपी'ला मिळाले 'जेन-झी'नेतृत्व, 26 वर्षीय शविना राज्य अध्यक्षपदी; आमदार बोरकरांकडून नवी टीम जाहीर

खरी कुजबुज: युरी भावी मुख्यमंत्री?

SCROLL FOR NEXT