Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' घुसला सिंधुदुर्गात भरवस्तीत! लोकांनी पिटाळले फटाके वाजवून; पुन्हा गोव्यात परतण्याची भीती

Omkar Elephant Sindhudurg: लोकांनी फटाके आणि ढोल-ताशे वाजवून त्याला रहिवासी भागामधून गावालगतच्या शेतात पिटाळले. असे असले, तरी तेथील लोक हत्तीच्या दहशतीखाली आहेत.

Sameer Panditrao

पेडणे: गेले दोन आठवडे गोव्यातील तांबोसे आणि उगवे भागात शेती-बागायतीचे अतोनात नुकसान करणाऱ्या ओंकार हत्तीने आपला मुक्काम सातोसे (जि. सिंधुदुर्ग) भागात हलविला. यामुळे गेले काही दिवस हत्तीच्या दहशतीखाली असलेल्या तांबोसे आणि उगवे गावातील लोकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

गोमंतकीयांसाठी ही दिलासादायक बाब असली, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी तो हत्ती मोठी डोकेदुखी बनला आहे. सातोसे गावात पोचल्यानंतर ओंकार हत्तीने तेथील रहिवासी भागात प्रवेश केल्याने लोकांचे धाबे दणाणले आहे.

लोकांनी फटाके आणि ढोल-ताशे वाजवून त्याला रहिवासी भागामधून गावालगतच्या शेतात पिटाळले. असे असले, तरी तेथील लोक हत्तीच्या दहशतीखाली आहेत. महाराष्ट्र वन खात्याचे अधिकारीही या हत्तीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

पुन्हा गोव्याकडे परतण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वन खात्याने सातोसे येथील लोकांना या हत्तीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या हत्तीला पुन्हा गोव्याच्या हद्दीच्या दिशेने हाकलून लावण्याचा प्रयत्न झाल्यास तो परत गोव्यात येऊ शकतो. तो राज्यात शिरू नये, यासाठी गोवा वन खात्याचे कर्मचारी सतर्क राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: काणकोणकर हल्लाप्रकरणी सूत्रधार कोण? PM मोदींना देणार निवेदन; पोलिसांची ‘रासुका’ लावण्यासाठी हालचाल

India vs Pakistan: कुलदीपच्या 'फिरकी'ची जादू! फायनलमध्ये इतिहास रचण्याची संधी, क्रिकेटच्या इतिहासात कधीच असं घडलं नाही

Khazan Farming: हजारो वर्षांपासूनचा वारसा! नद्यांच्या काठावरची 'खाजन शेती' ही गोव्याची ओळख..

Suryakumar Yadav: टीम इंडियाचा कर्णधार गोव्यात! 'मिस्टर 360'च्या हस्ते होणार भव्य क्रिकेट मैदानाचं उद्घाटन; CM सावंतांची उपस्थिती

Goa Cricket: रोमहर्षक सामन्यात गोव्याचा विजय! सुपर ओव्हरमध्ये कर्नाटकवर मात; 19 वर्षाखालील संघाची धडाकेबाज कामगिरी

SCROLL FOR NEXT