Omkar elephant Mumbai Goa highway Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: ‘ओंकार’ने रोखला मुंबई-गोवा महामार्ग, वाहतूक दीड तास ठप्प; दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा, नागरिक भयभीत

Omkar elephant Mumbai Goa highway: काही दिवसांपासून बांदा, मडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हाहाकार माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला.

गोमन्तक डिजिटल टीम

बांदा: मागील काही दिवसांपासून बांदा, मडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हाहाकार माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने थेट रस्त्यावर ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. त्यानंतर हत्तीने इन्सुलीच्या भरवस्तीतील कुडवटेंब व सावंतटेंब परिसरात आश्रय घेतला.

शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओंकार महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हत्ती काही काळ रस्त्यावर फिरत राहिला. वाहनांच्या हॉर्नकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली.

वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हत्तीला परत जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले; मात्र हत्तीने महामार्ग ओलांडत इन्सुली गावात प्रवेश केला. गेल्या पंधरा दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाने जेरबंद मोहीम राबवली असली तरी अद्याप ती यशस्वी ठरलेली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आमच्या रोजच्या जगण्यावर हा हत्ती संकट बनला आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प राहिल्यानंतर हत्ती हळूहळू जंगलाच्या दिशेने वळल्याने परिस्थिती सामान्य झाली. मात्र, तो पुन्हा महामार्गावर परत येण्याच्या भीतीने स्थानिक नागरिक आणि वाहनचालक अजूनही धास्तावलेले आहेत.

आवाज ऐकताच सारे थबकले

या थरारक अनुभवाबाबत इन्सुलीचे ग्रामस्थ गुरू पाटील म्हणाले, ‘‘आज सायंकाळी मी रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून ‘ओंकार’ हत्ती येताना दिसला. सुरुवातीला आम्हाला वाटले, तो रस्ता ओलांडून जाईल; पण तो थेट महामार्गाच्या मधोमध उभा राहिला. वाहने थांबली, हॉर्न वाजू लागले; पण त्याला काहीच फरक पडला नाही. त्याने सगळीकडे गोंधळ उडाला. लोक दुचाकी आणि वाहने सोडून बाजूला पळू लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT