Omicron-variant Dainik Gomantak
गोवा

दाबोळी विमानतळ ओमिक्रॉन विरुद्ध लढ्यासाठी सज्ज

युकेहून शनिवारी दाबोळी विमानतळावर आगमन झालेल्या 246 प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

‘कोविड-19’च्या ओमिक्रॉन (Omicron-variant) प्रकाराबद्दल केंद्र सरकारने (Government) जो प्रोटोकॉल जाहीर केला आहे, त्यासंबंधी दाबोळी विमानतळावर (Daboli Airport) योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. युकेहून शनिवारी दाबोळी विमानतळावर आगमन झालेल्या 246 प्रवाशांची (Passengers) आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी करण्यात आली.

सर्वाचा अहवाल नकारात्मक आल्याचे दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गगन मलिक यांनी सांगितले. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. प्रवाशांनाही योग्य त्या सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

ओमिक्रॉन या नव्‍या प्रकारासंबंधी जोखीम असलेल्या बारा देशांसाठी (Countries) खास प्रोटोकॉल तयार केला आहे. या बारा देशांच्या यादीमध्ये युकेचे नाव आहे. या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी दाबोळी विमानातळावर खास सोय केली आहे.

तपासणीनंतरही सतर्कता

दाबोळी विमानतळावर आगमन झालेल्यांची प्रोटोकॉलनुसार सँपल घेऊन चाचणी करण्यात आली. सर्वाचा अहवाल जरी नकारात्मक आला, तरी त्यांना पुढील सात दिवस घरात विलगीकरणात राहावे लागेल. त्यानंतर त्यांना पुन्हा चाचणी करावी लागेल. शनिवारी आलेल्या 246 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी अवघ्या साडेचार तासांमध्ये पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांकडून येणाऱ्या सूचनांनुसार (Instructions) तेथील व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. मोबाईल चार्जिंग पॉईंटची व्यवस्था केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT