राजधानी पणजीत ‘इफ्फी’ (IFFI) महोत्सवावेळी लोकांच्या गर्दीने गजबजलेला मांडवी नदी किनारा पुन्हा एकदा गजबजणार आहे. पणजीत (Panaji) मेरी इमॅक्युलेट चर्च फेस्तानिमित्त या नदीकिनारी सुमारे 410 स्टॉल्स उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही फेरी सहा दिवस सुरू राहणार असून लोकांना विविध सामान खरेदी करता येणार आहे.
या फेरीसंदर्भात अधिक माहिती देताना पणजी (Panaji) महापालिकेच्या मार्केट (Market) समितीचे अध्यक्ष प्रमेय माईणकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी कोरोना (Corona) महामारीमुळे दरवर्षी पणजी चर्चच्या (Church) फेस्तनिमित्त फेरी भरते. या फेरीसाठी लोकांची मोठी गर्दी होते. लोकांना फेस्तचा (Fest) आस्वाद घेता येणार आहे. खाजे व चणे या पारंपरिक व्यवसायांना चर्चच्या परिसरातच स्टॉल्स घालण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर त्यांना शुल्क न आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पणजी फेरी धक्का ते कला अकादमीपर्यंतच्या पदपथावर हे स्टॉल्स उभारण्यास परवानगी देण्यात आली असून प्रत्येक स्टॉल्सचा आकार 8 चौ. मी. असणार आहे. या स्टॉल्ससाठी आज पणजी महापालिकेत मोठ्या संख्येने व्यावसायिकांनी गर्दी केली होती. सुमारे 450 स्टॉल्सची आखणी करण्यात आली असली तरी 410 स्टॉल्सना परवानगी देण्यात आली आहे. या स्टॉल्सच्या वितरणाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी अर्जदारांकडून आधार कार्ड तसेच गोव्यातील (Goa) निवडणूक ओळखपत्राचा पुरावा घेण्यात आला आहे, असे माईणकर म्हणाले.
या फेरीमध्ये कपडे, फर्निचर, घरगुती लागणारे सामान या स्टॉल्सचा समावेश असेल. प्रत्येक स्टॉल्सचा आकार 8 चौ. मी.चा असणार आहे. फर्निचर (Furniture) स्टॉल्सधारकांना जागा मोठी लागते. त्यामुळे त्यांना दोन स्टॉल्स एकत्रित करण्यास मुभा दिली जाईल. प्रत्येक चौ. मी.ला 62.5 रुपये शुल्क प्रत्येक दिवशी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सहा दिवसांच्या या फेरीसाठीच्या एका स्टॉल्ससाठी तीन हजार रु. शुल्क आकारले जाणार आहे. ही फेरी आजपासून सुरू होऊन 13 डिसेंबरला संपणार आहे. आणखी मुदत वाढवून दिली जाणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.