Omicron Impact Goa Tourism sector applying wait and watch policy on Christmas festival  Dainik Gomantak
गोवा

Omicron Impact: ख्रिसमसच्या तोंडावर गोवा पर्यटन क्षेत्राचे 'wait and watch' धोरण

गोवेकरांनी कोविड -19 च्या काळातही व्यवसाय करणे शिकले पाहिजे

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील (Goa) जगप्रसिद्ध फेस्टिव्हल म्हणजे ख्रिसमस (Christmas). यावर्षी ख्रिसमस-नववर्ष साजरे होण्यापूर्वी, गोव्यातील पर्यटन (Goa Tourism) क्षेत्र दक्षिण आफ्रिकेत नुकताच आढळलेला आणि जागतिक आरोग्य संघटनेने 'ओमिक्रॉन' (Omicron) असे नाव दिलेल्या एका नवीन कोरोनाव्हायरसच्या (Covid-19) प्रकाराचा संभाव्य परिणाम काय होणार याचा विचार करत आहे. आणि 'वेरिएंट ऑफ कन्सर्न' (Variant of Concern) असे लेबल देखील गोव्यात लावले आहे, अशी माहिती गोव्यातील पर्यटन (Goa Tourism Sector)विभाभागाकडून मिळाली आहे.

"विदेशी पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर्ड उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय सेवा डिसेंबरच्या मध्यापासून येण्यास सुरुवात होते, कोविड नंतर गोवा आणि काही किनारपट्टीची राज्य देशांतर्गत प्रवाशांसाठीचे पसंतीचे ठिकाण बनले असल्याने दिवाळीच्या काळात आणखी एका फलदायी हंगामाची अपेक्षा गोव्यातील पर्यटन विभाग करत आहे," असे गोवा पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले.

"आम्ही वाट पाहत आहोत, आत्तापर्यंत (ओमिक्रॉनचा) कोणताही परिणाम राज्यात दिसून आलेला नाही, परंतु आम्हाला आणखी पुढील 15 दिवसांतील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवावे लागेल. जर राज्यात प्रकरणे वाढली तर कोविड प्रोटोकॉलचे कडक पालन करावे लागेल," असे ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी माध्यमांना सांगितले.

बेसावधगिरीचा हे भूतकाळात वाढलेल्या कोविड प्रकरणाचे प्राथमिक कारण होते, जरी देश आता कोरोना उद्रेकाला तोंड देण्यासाठी अधिक सुसज्ज असले तरी काळजी घेणेही महत्वाचे आहे. आतापर्यंत देशातील पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के लोकांनी कोविड -19 चा किमान एक डोस घेतला आहे.

राज्यात येण्याची अपेक्षा असलेल्या चार्टर्ड फ्लाइट्सच्या परिस्थितीचे स्पष्टीकरण देताना शाह म्हणाले, "व्हिसा जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रशियातील कोविड-19 ची तीव्र लाट थंडावत आहे, यूकेमधील प्रकरणे कमी होत आहेत. केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली आणि बरेच पर्यटक येथे नियोजित फ्लाइटने येत आहेत."

गोव्यातील ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा हंगाम सुरू होत असतानाच या नवीन विषाणूचा प्रकार चिंतेत भर घालणारा आहे. गोवा हे सुरक्षित ठिकाण आहे कारण 100 टक्के पात्र लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. शिवाय, "आम्ही तसे कोरोनाला घाबरत नाही. कोविड -19 च्या काळातही आपल्याला व्यवसाय करणे शिकले पाहिजे," असे शहा यांनी ठामपणे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT