Goa Accident | Oil Leakage
Goa Accident | Oil Leakage  Dainik Gomantak
गोवा

Oli Leakage on Road : पणजी-फोंडा मार्गावर ऑईल गळती; अनेक वाहनांचा अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

Oli Leakage on Road : पणजी-फोंडा मार्गावर कंटेनरमधून ऑईल गळती झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे अनेक वाहनांचा अपघात झाला. आज मंगळवारी सकाळी खोर्ली परिसरातून ऑईल गळतीस सुरुवात झाली होती. हा कंटेनर कुंडईमध्ये सापडला.

आज सकाळी पणजी-फोंडा मार्गावर खोर्ली येथून ते बाणस्तारी पुलापर्यंत रस्त्यावर ऑईल सांडल्याने रस्ता निसरडा बनला होता. सकाळी 8.20 वाजता ही घटना घडल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऑईल सांडल्यामुळे अनेक वाहनांचा अपघातही झाल्याची माहिती आहे. काही लोकांनी ऑईल गळती झालेल्या कंटेनरचा पाठलाग केला. कुंडई येथील एका पेट्रोल पंपावर हा कंटेनर उभा करण्यात आला होता.

दरम्यान या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर ऑईल गळती होत असल्याने खोर्लीपासून फोंड्याच्या मार्गावर अनेक वाहने घसरल्याने अपघात झाल्याचं पाहायला मिळालं. हे ऑईल नेमकं कोणत्या प्रकारचं होतं याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. आपत्कालीन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी ऑईल सांडलेल्या ठिकाणी वाळू आणि माती टाकून रस्ता वाहतुकीस योग्य केला. मात्र सकाळच्या वेळात ही ऑईल गळती झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT