Old Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

Old Mandovi Bridge: वाहतूक कोंडीला राम राम; 13 दिवसानंतर जुना मांडवी पूल खुला

Old Mandovi Bridge Open For Traffic: सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाचे काम पूर्ण होताच तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करून दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मांडवी नदीवरील जुना पूल शुक्रवारी सायंकाळी वाहतुकीस खुला झाला. १५ फेब्रुवारीपासून या पुलाचे दुरुस्ती काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले होते. चौदाव्या दिवशी हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने आता पर्वरीकडून येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही.

मांडवीवरील जुन्या पुलाचे दुरुस्ती काम हाती घेतल्यामुळे नव्या पुलावर वाहनांची कोंडी होऊ लागली. त्यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. या पुलाचे दुरुस्तीचे कामाचा परिणाम नव्या पुलावर दररोज वाहतूक कोंडी नजरेस पडू लागली.

पर्वरीकडील बाजूकडून येणाऱ्या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाचे काम पूर्ण होताच तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rare Goan food: 1960 नंतर कमी झालेले, दुर्मिळ गोवन अन्नपदार्थ

Goa Fraud Case: गोव्यातील 500 जणांना 2 कोटी 90 लाखांचा गंडा, जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; सावंतवाडीतील तिघांना अटक

Shantadurga Devi Jatra: श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची जत्रा, सर्व धर्म एकतेचे प्रतिक

नाताळच्या गर्दीत जीवरक्षक ठरले 'देवदूत'! 6 पर्यटकांना जीवदान, तर हरवलेली 6 मुले पुन्हा कुटुंबाच्या स्वाधीन

पृथ्वीच्या अंगावर जसे ऋतू खेळतात त्याच प्रकारे आपल्या शरीरात पचन इंद्रिये ऋतूंचे खेळ खेळतात; विचारांचे ऋतुचक्र

SCROLL FOR NEXT