old lady from panjim finds name missing in voters list Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

मतदारयादीतून नाव गायब, 88 वर्षीय आजी ताटकळत

निवडणूक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा नातेवाईकांचा आरोप

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान उत्साहात पार पडलं. मतदारांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. नवमतदारांपासून ते वयोवृद्ध मतदारांनी अगदी व्हिलचेअरवरुन येत मतदान केलं. मात्र असं असलं तरी काही ठिकाणी मात्र मतदारांची काहीशी निराशा झाली. (Goa Election News Updates)

पणजीतील एका 88 वर्षीय आजींनाही निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका बसला. पणजीतील या आजी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाल्या मात्र मतदार (Voters) यादीत नावच नसल्याने त्यांची घोर निराशा झाली. बराच वेळ त्यांनी मतदान केंद्राबाहेर वाट पाहिली पण पदरी निराशाच पडली. धक्कादायक बाब म्हणजे याच आजींच्या 97 वर्षींय मृत शेजाऱ्याचं नाव मात्र मतदार यादीत होतं. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आजींनी मात्र नाराजी व्यक्त केली.

पणजीतील (Panjim) नेवगी नगर परिसरात राहणाऱ्या सेबेस्टिआना डिनिझ आपलं मत नोंदवण्यासाठी पोलिंग बूथ 11 वर पोहोचल्या. मळा या पणजीतील भागामध्ये हे मतदान केंद्र होतं. मतदार यादीत नाव नसल्याने भरउन्हात तब्बल तीन तास त्यांनी वाट पाहिली. मात्र यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकाऱ्यांनी आपली हतबलता दाखवली. त्यामुळे इच्छा असूनही केवळ मतदार यादीत नाव नसल्याने या आजींना मतदानापासून वंचित राहावं लागलं. दरम्यान निवडणूक अधिकारी आणि बूथ अधिकाऱ्यांना याबाबत अधिकार असूनही त्यांनी केवळ उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT