मडगाव: तृणमूल, आप, काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशी पंचरंगी लढत असलेल्या ‘हाय प्रोफाईल’ नावेली मतदारसंघात आज सकाळपासून तणाव होता. सायंकाळी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार वालंका आलेमाव यांच्या बहिणी पैसे वाटतात असा आरोप झाल्याने वातावरण पुन्हा चिघळले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
नावेलीत तृणमूल काँग्रेसच्या (congress) उमेदवार वालंका आलेमाव यांच्या बहिणींनी पैसे वाटल्याचा आरोप प्रतिमा कुतिन्हो आणि दिग्विजित चव्हाण या उमेदवारांनी केला. इतकेच नाही, तर या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेरावही घातला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले. आलेमाव बहिणी एका घरात घुसून बसल्या आहेत त्यांना बाहेर काढण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत येथे तणाव होता.
तृणमूल कार्यकर्त्यांकडून अपशब्द
सकाळी हाउसिंग बोर्डमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार रेहान मुजावर यांच्या समर्थकांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अपशब्द उच्चारल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा तणाव थंड केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.