Old Goa  Dainik Gomantak
गोवा

Old Goa News : ‘हात कात्रो खांब’ पूर्ववत करण्याच्या कामास सुरवात

Old Goa News : इतिहासप्रेमींनी आवाज उठविल्यानंतर कृती

गोमन्तक डिजिटल टीम

Old Goa News : तिसवाडी, जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हात कात्रो खांबा’ची पिळवी पट्टी रंगवून विटंबना करण्यात आली होती. परंतु इतिहासप्रेमी आणि प्रसारमाध्यमांकडून आवाज उठविल्यानंतर आता सरकारकडून खांब पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रस्ता रंगवताना कंत्राटदाराने ऐतिहासिक ‘हात कात्रो खांब’देखील रंगवला होता. त्यात खांबाच्या तळाला आणि मध्यभागी पिवळी पट्टी रंगविण्यात आली होती. तेव्हा यासंदर्भात ‘दै. गोमन्तक’कडून वृत्त देण्यात आले होते.

त्यानंतर गेल्या महिन्यात काही प्रसारमाध्यमांकडूनदेखील व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे खांब पूर्ववत करण्याचा दबाव सरकारवर आला होता.

यापूर्वी देखील ‘हात कात्रो खांबा’च्या विटंबनेवरून इतिहासप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी खांब रस्त्याच्या मध्यभागी आल्याने अवजड वाहनांकडून ठोकरण्याची भीती निर्माण झाली होती. त्यात खांब उड्डाणपुलाखाली स्तलांतरित करण्यात आला होता.

‘हात कात्रो खांबा’चे मूळ ठिकाण हे जुने गोवे येथील गांधी चौकाजवळ होते. याचे पुरावे १९१० साली असलेल्या नकाशात आहेत. आता ज्या ठिकाणी खांब आहे, तेथे मजूर जमा होतात. त्यामुळे या खांबाला धोका आहे. आता सरकारकडून काम सुरू असताना रंग काढण्यासाठी रसायन वापरल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी हा खांब जुने गोवे येथील डाक घराच्या मागील उद्यानात स्तलांतरित करण्यात यावा.

- संजीव सरदेसाई, इतिहास कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT