Padma Shri Sanjay Patil  Dainik Gomantak
गोवा

Old Goa News : विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवावेत :पद्मश्री संजय पाटील

Old Goa News : गोवा कृषि महविद्यालयात मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Old Goa News :

जुने गोवे, अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेल्या कृषी विद्यार्थ्यांनी शेतीच्या तंत्रात क्रांतिकारक बदल केले तरच शेती किफायतशीर आणि भाविष्यदायी ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री संजय अनंत पाटील यांनी केले.

त्यांनी गोवा कृषि महविद्यालयामध्ये प्रगतिशील शेतकरी व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी कृषी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

नैसर्गिक शेती, कुळागर आणि शून्य ऊर्जा सूक्ष्म सिंचन प्रणाली या विषयावर त्यांनी कृषि पदवीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावर्षीचा भारत सरकारचा कृषी क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार संजय पाटील यांना जाहीर झाल्यामुळे, गोवा कृषी महाविद्यालयाने त्यांचा सत्कार समारंभ ही आयोजित केला होता.

पाटील म्हणाले की, आपण स्वतः नैसर्गिक शेती करतो. लागवडीचा खर्च वाढल्याने, केवळ पारंपरिक तंत्राचा वापर आणि विपणनाचे तंत्र शेतकऱ्यांना कोणीही नीटपणे शिकविल्याने शेती व्यवसायाबद्दल नकारत्मक दृष्टीकोन विकसित झाला.

शेतीचा सबंध अर्थकारणाप्रमाणेच संस्कृतीशी आणि निरामय जीवनाशी देखील आहे. याबद्दल प्रबोधनाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

नैसर्गिक शेती अवलंबली तर पर्यावरणपूरक संधी निर्माण होतील आणि शाश्वत शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.

शाश्वत पद्धतीने विशिष्ट पिकांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जिवामृत, घन जिवामृत, पंचगव्य, गांडूळखत प्रणालीचा वापर केल्यास अत्यंत कमी खर्चामध्ये फायदेशीर शेती करता येऊ शकते.

-पद्मश्री संजय पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT