Goa Congress: उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसचे गोव्यात गुप्त सर्वेक्षण, शेजारच्या राज्यांतून दोन नेते दक्षिणेत

Goa Congress:दक्षिण गोव्यातून खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचीच उमेदवारी कायम ठेवणार का, यावर काँग्रेसने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही
Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak

भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून नवा चेहरा म्हणून राजकीय परिघाबाहेरील पल्लवी धेपे यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आणल्यानंतर सावध झालेल्या कॉंग्रेसने हा मतदारसंघ राखण्यासाठी काळजी घेणे सुरू केले आहे.

या परिस्थितीत कोणाला उमेदवारी दिली तर विजय मिळवता येईल याची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या विश्वासातील दोन नेत्यांना शेजारील राज्यांतून सर्वेक्षणासाठी दक्षिण गोव्यात पाठवले आहे.

दक्षिण गोव्यातून खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचीच उमेदवारी कायम ठेवणार का, यावर काँग्रेसने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. माजी अधिकारी एल्विस गोम्स यांनी राज्यात काँग्रेस संघटना खिळखिळी झाली असून आपण थेटपणे पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी आपण ३० वर्षांनंतर प्रथमच उमेदवारीची मागणी पक्षाकडे केल्याचा भावनिक मुद्दा पुढे आणला आहे. दाबोळी मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत ६ हजार २४ मते घेतलेल्या विरियातो फर्नाडिस यांनीही उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे.

त्या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुझे फिलिप डिसोझा यांनी १ हजार ३७ मते घेतली होती. दोन्ही काँग्रेस एकत्र असत्या तर विरियातो आज आमदार असते. यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी हा पेच कॉंग्रेसच्या नेतृत्वासमोर आहेच याशिवाय सध्या दक्षिण गोव्यात काँग्रेसचा खासदार असल्याने त्यांना ही जागा गमवायची नाही.

Goa Congress
Vasco Extortion Case: आणखी दोघांना अटक, दोन पोलिसही निलंबित; वास्कोतील खंडणी प्रकरणाला नवे वळण

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारावरून गोंधळ सुरू असताना, शेजारच्या राज्यातून दोन निरीक्षकांना मतदारसंघात याचसाठी गुप्त सर्वेक्षण करण्यासाठी पाठवले आहे.

मूक मतदार'वर लक्ष केंद्रित

- मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक बुधवारी गोव्यात पोहोचले आणि त्यांनी दक्षिण गोव्यात त्यांचे काम सुरू केले आहे. ते मतदारसंघातील विविध भागांना भेटी देत आहेत आणि त्यांनी फोंडा, शिरोडा, कुंकळ्ळी, केपे, कुडचडे, सावर्डे, सांगे आणि काणकोण येथे माहिती संकलित केली आहे.

- 'मूक मतदार' या घटकावर लक्ष केंद्रित करून माहिती घ्या, असे त्यांना स्पष्टपणे बजावण्यात आले आहे. नुवे, कुडतरी, बाणावली आणि नावेलीचा दौरा त्यांनी आज (गुरुवारी) केला. आमदार दिगंबर कामत आणि आमदार विजय सरदेसाई यांच्या मडगावातील संघर्षाचा फायदा कसा घेता येईल, याची माहिती ते घेत आहेत. उद्या शुक्रवारी हा अहवाल थेटपणे खर्गे यांना सादर होणार आहे.

Goa Congress
Vedanta Mining In Goa: सहा वर्षानंतर गोव्यात खाण व्यवसायाचा श्रीगणेशा, सेसा वेदांताचा ब्लॉक-1 कार्यान्वित

काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज

सूत्रांनी सांगितले, की दक्षिण गोव्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये एकजूट नसल्याने काँग्रेसचे श्रेष्ठी चांगलेच नाराज झाले आहेत. निवडणूक संपल्यानंतर कडक कारवाई केली जाईल अशी चर्चा आहे.

उघड आणि छुप्या पद्धतीने पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशी समज प्रदेश पातळीवर याआधीच देण्यात आली आहे. पक्षात तेढ निर्माण करणाऱ्या आणि मतदारांना नाराज करणाऱ्या दक्षिण गोव्यातील काँग्रेसच्या २-३ नेत्यांना असा इशारा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com