"सरकारी नोकर भरतीत अन्याय नको", दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींकडून संताप व्यक्त; धो धो पावसातही मराठीप्रेमींचा निर्धार

Government Recruitment Protest : सरकारी नोकरीसाठी कोकणी सक्तीची करून मराठीला डावलल्याचा तीव्र निषेध आज बुधवारी फोंड्यातील दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींनी केला.
government recruitment protest
Government Recruitment InjusticeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: सरकारी नोकरीसाठी कोकणी सक्तीची करून मराठीला डावलल्याचा तीव्र निषेध आज बुधवारी फोंड्यातील दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींनी केला. मुसळधार पाऊस असूनही मोठ्या संख्येने मराठीप्रेमींनी एकत्रित येऊन आपला आवाज बुलंद केला.

मराठी भाषा निर्धार समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मराठीप्रेमी एकवटले होते. मराठी भाषकांच्या बळावर निवडून येणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि मगो पक्षाला आता मराठीप्रेमींनीच जाब विचारावा, मराठीप्रेमींच्या मतांवर भाजप आणि मगो पक्षाचे सरकार सत्तेवर आले त्याचा विसर या दोन्ही पक्षांना पडला असून या पक्षांना मराठीप्रेमींनी जाब विचारावा, असे आवाहन गो. रा. ढवळीकर यांनी केले.

government recruitment protest
Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

गो. रा. ढवळीकर म्हणाले, पंधरा वर्षांचा वास्तव्याचा दाखला असला तरीही कोकणी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांनाच सरकारी नोकऱ्यांत संधी मिळेल असे सरकारने जाहीर केले आहे, त्यामुळे गोव्यात जन्मलेल्या गोमंतकीयांचा हक्कच सरकारने काढून घेतला असल्याचे सिद्ध झाले आहे. याचा जाब भाजपवाल्यांना विचारण्याबरोबरच काँग्रेस पक्षाने मराठी आणि कोकणी असा समतोल बाळगला होता, पण भाजपवाल्यांनी तो बिघडवून टाकला आहे.

मगो पक्षाने तर मागच्या काळात मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आणले होते. मराठीप्रेमीच्या मतांवर मगोने ही बाजी मारली होती. आताही मगो पक्षाने ठामपणे मराठीच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.

भाजपला त्याचा जाब विचारायला हवा, तरच मराठीला मानाचे स्थान मिळू शकते, असे सांगून सर्व मराठीप्रेमी मगो पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असे सांगून मराठीला डावलल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा गो. रा. ढवळीकर यांनी भाजप आणि मगो पक्षाला दिला आहे.

government recruitment protest
Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

यावेळी मराठी निर्धार समितीचे पदाधिकारी शाणूदास सावंत, विठ्ठलदास नागवेकर, गोविंद देव, जयवंत आडपईकर, दिवाकर शिंक्रे, हनुमंत नाईक, अनिता तिळवे व इतरांनी आपले विचार व्यक्त करताना मराठीला डावलल्यास त्याचा विपरीत परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावा लागेल, असा इशारा दिला.

सरकारने मराठीला डावलून सरकारी नोकरीत कोकणी परीक्षा उत्तीर्ण सक्तीची केल्यामुळे मराठीप्रेमी संतापले आहेत. त्यासाठी राज्यभर निषेध आंदोलने छेडली जात आहेत. फोंड्यातील या आंदोलनावेळी सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत असतानाही मराठीप्रेमी मोठ्या संख्येने दादा वैद्य चौकात जमा झाले होते. अर्धा दिवस आंदोलन छेडून मराठीप्रेमींनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सर्वाधिक वापर मराठीचाच!

राज्यात सर्वाधिक वापर हा मराठीचाच होत आहे. राज्यातील वर्तमानपत्रे ही सर्वाधिक मराठीतूनच प्रसिद्ध होत असतात. त्याचबरोबर राज्यातील सर्वाधिक उत्सव, नाटके, कार्यक्रम हे मराठीतूनच होत असताना मराठीला सरकार डावलू शकत नाही. सत्ताधाऱ्यांनी मराठीला डावलल्यास मराठीप्रेमी पेटून उठतील, असा इशारा देऊन सर्व मराठीप्रेमींनी एकसंध रहावे, असा या धरणे आंदोलनाच निर्धार व्यक्त करण्यात आला.

डिचोलीत आज लाक्षणिक धरणे

मराठी राजभाषा निर्धार समितीच्या डिचोली प्रखंडतर्फे उद्या (ता. ३०) डिचोलीत एक दिवसीय लाक्षणिक धरणे धरण्यात येणार आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरु असलेल्या निर्धार समितीच्या अभियानांतर्गत हा धरणे कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मराठीप्रेमींतर्फे हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

वास्कोत उद्या आंदोलन

सरकारी नोकरीसाठी कोकणी भाषेच्या सक्ती विरोधात दर्शवण्यासाठी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मूरगाव प्रखंडतर्फे ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते ५.३०. वाजेपर्यंत मुरगाव नगरपालिका कार्यालयासमोर प्रतिकात्मक निषेध-धरण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com