Super Cup 2025 : धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

FC Goa : एफसी गोवाने प्रभावी खेळ करताना इंटर काशी एफसीवर ३-० असा देखणा विजय नोंदवून एआयएफएफ सुपर कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
Super Cup 2025
Super Cup 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एफसी गोवाने प्रभावी खेळ करताना इंटर काशी एफसीवर ३-० असा देखणा विजय नोंदवून एआयएफएफ सुपर कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. गतविजेत्यांनी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम बुधवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केल्यामुळे त्यांचे ब गटात सर्वाधिक सहा गुण झाले.

मागील लढतीत बलाढ्य नॉर्थईस्ट युनायटेडला गोलबरोबरीत रोखलेला आय-लीग विजेता इंटर काशी संघ बुधवारी एफसी गोवाच्या सफाईदार खेळासमोर निष्प्रभ ठरला. एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेत खेळणाऱ्या संघाने पूर्वार्धातच तीन गोल करून विजय पक्का केला होता.

Super Cup 2025
Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

सर्बियन देयान द्राझिच याने चौथ्याच मिनिटास पहिला गोल केला. त्यानंतर स्पॅनिश बोर्हा हेर्रेरा याने चार मिनिटांत दोन गोल करून एफसी गोवाची स्थिती खूपच बळकट केली. गतमोसमातील सुपर कप अंतिम लढतीत दोन गोल केलेल्या हेर्रेरा याने त्या कामगिरीची पुनरावृत्ती करताना अनुक्रमे ३८ व ४२व्या मिनिटास गोल केला. भक्कम आघाडीमुळे एफसी गोवास उत्तरार्धात जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.

ब गटातील समीकरण

एफसी गोवाचे ‘ब’ गटात सर्वाधिक सहा गुण झाले आहेत. अखेरच्या लढतीत एक नोव्हेंबर रोजी नॉर्थईस्ट युनायटेडने त्यांना नमविले, तरीही मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे अग्रस्थान अबाधित राहील व त्यांच्या उपांत्य फेरीतील स्थानाला धक्का लागणार नाही.

सलग दोन बरोबरीमुळे नॉर्थईस्ट युनायटेडचे दोन गुण झाले असून अखेरचा सामना जिंकल्यास त्यांचे पाच गुण होतील, त्यामुळे ते एफसी गोवास मागे टाकू शकणार नाहीत. जमशेदपूर एफसी व इंटर काशी एफसी यांचा प्रत्येकी एक गुण झाला असून त्यांच्यातील अखेरचा साखळी सामना फक्त औपचारिकता असेल.

Super Cup 2025
Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

नॉर्थईस्टला बरोबरीचा फटका

सामन्यातील एक मिनिट बाकी असताना कॅमेरुनच्या राफेल मेस्सी बौली याने केलेल्या गोलमुळे जमशेदपूर एफसीने पिछाडीवर २-२ अशी गोलबरोबरी साधली आणि त्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. ब गटातून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी ड्युरँड कप विजेत्या नॉर्थईस्टला बुधवारचा सामना जिंकणे अत्यावश्यक होते.

स्पॅनिश चेमा नुनेझ याने २०व्या आणि मोरोक्कन अलाएद्दीन अजारेई याने २९व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे गुवाहाटीस्थित संघ भक्कम स्थितीत होता. ४३व्या मिनिटास प्रणय हल्दर याने जमशेदपूरची पिछाडी कमी केल्यानंतर ८९व्या मिनिटास मेस्सी बौली याच्या गोलमुळे जमशेदपूरने सलग दुसरा पराभव टाळला. अगोदरच्या लढतीत त्यांना एफसी गोवाने २-० फरकाने हरविले होते, तर नॉर्थईस्ट युनायटेडला इंटर काशी एफसीनेही २-२ गोलबरोबरीत रोखले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com