Old Goa Road Closure Dainik Gomantak
गोवा

उड्डाणपुलाच्या कामामुळे जुने गोवे-गवंडाळी मार्गावर 31 डिसेंबरपर्यंत वाहतूक बंद, अधिसूचना जारी; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Old Goa Road Closure: वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: जुने गोवे परिसरातील रेल्वे फाटक क्रमांक ३७ येथे उभारण्यात येत असलेल्या रस्ता उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे एला येथील फिशरमन ट्रेनिंग सेंटर ते गवंडाळी येथील धेंपो फुटबॉल मैदानादरम्यानचा रस्ता तात्पुरता बंद ठेवण्याचा कालावधी आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि बांधकाम प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

अधिसूचनेनुसार रस्ता दररोज दोन वेळा बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत तसेच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यास मनाई असेल. त्यामुळे या परिसरातून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. बंदीच्या कालावधीत जड व हलक्या वाहनांसाठी बाणस्तरी मार्ग हा प्रमुख पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध राहणार आहे.

सूचनांचे पालन करा!

बांधकामाच्या काळात प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा. सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाने नागरिकांसाठी संपूर्ण वळण मार्ग आराखडा आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. त्याचा उपयोग करावा, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT